भुसावळात काँग्रेसच्या डॉ मानवतकरांच्या प्रचाराचे भिंतींवर बॅनर्स, आचारसंहिताभंगाच्या कार्यवाहीकडे लक्ष

भुसावळ दि-19/11/2024, भुसावळ विधानसभा मतदारसंघात काल सायंकाळी 6 वाजता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपलेली असून सर्वच उमेदवारांना त्यांचे प्रचारार्थ लावण्यात आलेले बॅनर्स, पॉम्पलेट, होर्डिंग्स हटवण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले असून ते सर्व उमेदवारांना बंधनकारक आहे.असे असताना देखील आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून 58 मिनिटांनी भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील उड्डाणपुलाच्या खाली भिंतीवर भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर यांचे बॅनर चिटकवलेले आढळून आलेले आहेत. यामुळे निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झालेला असून त्यासंदर्भात आता निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले भरारी पथक आणि दक्षता पथक यांनी अजूनही उमेदवारांना त्यांनी लावलेले आणि चिटकवलेले छोटे बॅनर भिंतीवर चिटकवलेले दिसून येत असल्यामुळे या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग झालेला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे भुसावळ शहरवासियांचे लक्ष लागून आहे.













