Advertisement
क्राईम/कोर्टजळगावशैक्षणिक

भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दोन शाळकरी अल्पवयीन मुलींच्या क्रूर हत्येने मोठी खळबळ

जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात एका विहिरीत दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून,साकरी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोन्ही मुली शाळेत शिक्षण घेत होत्या आणि गावातीलच रहिवासी होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळी ही घटना गावाजवळील एका विहिरीत घडली असून, त्यांना तिथे विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
ग्रामस्थांनी संशयित आरोपीला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी आणले असताना त्याला ताब्यात देण्याची तीव्र मागणी केली आहे. ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला असून, यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ग्रामस्थांनी पोलिसांशी वाद घातला असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असला तरी, मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पोलिसांच्या विलंबामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली असून, यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे. हत्या का आणि कशा पद्धतीने झाली, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या क्रूर हत्येच्या घटनेमुळे भुसावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button