मुंबईत १६४ कोटींच्या खंडणी प्रकरणात लष्कराची MP-5 मशिनगन जप्त, PI दया नायक यांची धक्कादायक माहिती
३५ कोटींच्या १८ आलिशान गाड्या जप्त
मुंबई दि-05 फेब्रुवारी, ईडीच्या नावाने राजकीय नेते व बांधकाम व्यवसायिकांना धमकावून कोट्यवधी रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी हिरेन भगत याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील अटक झालेल्या आरोपींमध्ये राजेंद्र शिरसाठ, राकेश केडिया, कल्पेश भोसले, अमेय सावेकर,अविनाश दुबे, आणि हिरेन भगत यांचा समावेश आहे.
याबाबत मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक द्या नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालय अर्थात (इडी ) च्या कारवाईचा धाक दाखवून मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर ओंकार डेव्हलपर्सकडून तब्बल १६४ कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी मुंबईतील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आतापर्यंत या टोळीतील ६ जणांना अटक केलेली आहे. या ६ जणांची प्राथमिक चौकशी सुरू असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. या टोळीने आतापर्यंत अनेक उद्योगक, राजकीय नेते आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या कडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याची माहिती समोर आलेली आहे. या आरोपींनी गेल्या दोन वर्षांत वारंवार दुबईला येणेजाणे केलेले असून यांचे अंडरवर्ल्डशी धागेदोरे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य आरोपी हिरेन भगत यांचा खाररोडला ६० कोटींचा बंगला असून तब्बल ३५ कोटी किंमत असलेल्या १८ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. या टोळीतील इतरही आरोपींच्या संपत्तीची माहिती पोलिस तपासात समोर येणार आहे. या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडालेली असून ज्यांच्याकडून या आरोपींनी आतापर्यंत खंडणी वसूल केली आहे, त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे.
लष्कराची MP-5 मशिनगन सापडली !!
ईडीच्या नावाने मुंबईतील विविध व्यवसायिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुख्य आरोपी हिरेन भगत याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाठ, राकेश केडिया, कल्पेश भोसले, अमेय सावेकर आणि हिरेन भगत यांचा समावेश आहे. हिरेश भगतची चौकशी सुरू असताना पोलिसांना आरोपी हिरेन भगतच्या घरातून एमपी-५ मशिनगन सापडली. याचा वापर भारतीय लष्कराकडून विशेष मोहिमांमध्ये केला जातो. ही गन हिरेन भगतकडे कशी आली याचा तपास सध्या सुरू आहे. ही अत्यंत संवेदनशील घटना असून याचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संध्याकाळी मुख्य आरोपी अमेय सावेकरला अटक केली होती, तर अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाट, राकेश केडिया आणि कल्पेश भोसले या चौघांना रविवारी अटक करण्यात आली.या संशयितांना कंत्राट दिलेला विकासक सतीश धानुका हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवनीश दुबे यांचे वकील अजय दुबे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की त्यांच्या अशिलाला दोषी ठरवण्यात आले आहे आणि हा दोन विकासकांमधील दिवाणी वाद आहे.
पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी सांगितले की, वांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सीएचएसच्या पुनर्विकासावरून धानुका बिल्डर्स आणि ओंकार रिॲलिटीज यांच्यात वाद झाला. 2004 मध्ये सोसायटीने धानुकाच्या पुनर्विकासासाठी नियुक्ती केली होती, परंतु तो अयशस्वी ठरल्याने सोसायटीने ओंकार रिअल्टर्सची नियुक्ती केली. रेरा म्हणजेच नियोजन प्राधिकरणांनी एफएसआय 2.5 वरून 3 पर्यंत वाढवल्यानंतर सतिश धनुकाचा दावा सांगितला की, ओंकारने करोडोंचौश नफा मिळवला तर त्याचे मोठे नुकसान झाले.
शनिवारी वांद्रे पोलिसांत दाखल झालेल्या ताज्या प्रकरणात, ओंकार डेव्हलपर्सचे संचालक ताराचंद वर्मा यांनी सांगितले की, 7 जानेवारी रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि धनुकासोबत सेटलमेंट करण्यास सांगितले.दाखल एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, 10 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने वर्मा यांना भेटण्यास सांगितले आणि 164 कोटी रुपयांची मागणी केली अन्यथा ईडीकडे तक्रार करण्यात येईल.यावरून हे सगळे प्रकरण समोर आले आहे.