संजय राऊत,शरद पवारांची राज्यसभेची जागा धोक्यात, तर उद्धव ठाकरेंचीही आमदारकी धोक्यात, संख्याबळ घटल्याचा परिणाम
मुंबई, दिनांक-24/11/24, विधानसभा निवडणुकांचे धक्कादायक पराभव झालेले निकाल त्यातून महाविकास आघाडीचे नेते सावरत नाही तोच त्यांच्यासाठी आणखी पुन्हा एकदा खळबळजनक बाब समोर आलेली आहे. काल लागलेल्या विधानसभेच्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला 288 पैकी तब्बल 231 जागांवर महाविजय मिळालेला असून काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरद पवार 10 व उद्धव सेनेच्या 20, सपा 2, अशा महाविकास आघाडीला फक्त एकूण 48 जागा मिळालेल्या असून त्यांना आता विरोधी पक्षनेते पदासाठी असलेले 75 जागांचे संख्याबळ सुद्धा गाठता आलेले नाही. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यताही फार दुसर झालेली आहे. अशातच विधानसभेच्या 41 आमदारांच्या संख्याबळावर अवलंबून असलेले राज्यसभेचे सदस्यत्व तथा खासदारपद हे महाविकास आघाडीतील कोणत्याच घटक पक्षाकडे नसल्याने महाविकास आघाडीत प्रचंड खळबळ उडालेली आहे.त्यामुळे शरद पवार ,संजय राऊतांसह अनेकांची राज्यसभेची खासदारकी आणि उद्धव ठाकरेंसह अनेकांची विधान परिषदेची आमदारकी आता धोक्यात आलेली आहे. कदाचित संजय राऊत आणि शरद पवार यांची ही शेवटची राज्यसभेची टर्म असण्याची शक्यता सध्याच्या आकडेवारीवरून दिसून आलेली आहे. कारण शरद पवार यांनी यापूर्वीच ते लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केलेले असून संजय राऊत यांनी आजपर्यंत कोणतीही लोकसभा निवडणूक लढलेली नाही. ते नेहमी मागच्यादाराने आमदारांच्या मतांवर राज्यसभेवर निवडून आलेले आहेत. मात्र आता शिवसेनेकडे संजय राऊत यांना निवडून आणण्या एवढे संख्याबळ नसल्याने संजय राऊतांची मोठी पंचाइत झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचे राजकीय महत्त्व कमी होऊन त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अस्तित्व देखील धोक्यात येणार असल्याचे संकेत आकडेवारीहून समोर आलेले आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेवर उमेदवार निवडून येण्याबाबतच्या धोक्यांची हीच परिस्थिती महाराष्ट्रात आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची झालेली आहे.