चोपडा तालुक्यात गावठी पिस्तूलांचा मोठा शस्त्रसाठा जप्त, जळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कामगिरी
जळगाव ,दिनांक-21/09/2018 मध्य प्रदेशातील पार उमर्टी येथून चोपडा तालुक्यातील लासूर ते हातेड रोडने दोन इसम दोन इसम मोटरसायकलने गावठी बनावटीचे सात गावठी कट्टे (पिस्टल) विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळालेली होती. या गुप्त माहितीची खातरजमा करणेकामी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्या पथकाला चोपडा तालुक्यातील लासूर गावाकडून दोन इसम मोटरसायकलने येताना दिसले .त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात तब्बल 7 गावठी कट्टे (पिस्टल) 10 काडतूस, 2 मोबाईल फोन , आणि एक मोटारसायकल असा एकूण दोन लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने गावठी कट्ट्यांची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आलेले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे. यापूर्वी देखील अनेकदा मध्यप्रदेशातून चोपडा मार्गे होणारी गावठी कट्ट्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आलेले आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामें 1) सागर शरणम् रणसौरै (२४) रा.पुणे आणि 2) मनोज राजेंद्र खांडेकर (२५)रा .जुळेवाडी जि.सातारा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
या दोन्ही आरोपींवर याआधी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध स्वरूपातील गुन्हे दाखल असल्याची माहिती जळगाव पोलिसांनी दिली आहे.
सदरील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे.