जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसेंच्या निषेधाचा ठराव मंजूर- ना. गिरीश महाजन पर्यटन मंत्री
जळगाव दि-21 ऑगस्ट- जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा निषेधाचा ठराव करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध कामांंबाबत एकनाथ खडसेंनी तक्रारी तसेच चौकशींबाबतचे पत्र दिले व त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कामे रखडली व जळगाव जिल्ह्याचा विकास थांबला अशा तक्रारी आमदारांनी केल्यामुळे त्यावरून आमदार एकनाथ खडसे यांच्या निषेधाचा बैठकीत ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान या ठरावानंतर रखडलेल्या कामांची स्थगितीही उठवण्यात आले असून ते कामे करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ग्राम विकास मंत्री ना .गिरीश महाजन व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील या तिघा मंत्र्यांच्या उपस्थितीत आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या निषेधा ठराव करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत चौकशीचे पत्र एकनाथ खडसे यांनी दिलं होतं आणि या पत्रामुळे तब्बल 1000 कोटी रुपयांची काम जळगाव जिल्ह्यातली ही थांबली होती. असा प्रश्न भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला त्यानंतर सर्व आमदारांनीही त्याला सहमती दर्शवली आणि त्यानंतर या बैठकीत आमदार एकनाथ खडसे यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला आहे.
या विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की, राजकारण जरूर करावं मात्र जिल्ह्याचे पैसे थांबू नये हे मोठे पाप आहे. ज्या कामांचे वर्क ऑर्डर झाली त्या कामांच्या चौकशी लावून ते थांबवणे ही बाब चुकीची आहे काम झालेलं नाही कामाला सुरुवात झालेला नाही मात्र त्यापूर्वीच तुम्ही तक्रारी करत आहेत ..हे चुकीचे आहे.
याच विषयावरून मंत्री गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सर्व कारभार हा पारदर्शी झालेला असतानाही त्याबाबतच्या तक्रारी करणे चुकीचा आहे. खडसे यांनी सत्तेत असतानाही लोकांना ब्लॅकमेलिंगचेच काम केलं, विरोधात असतानाही तेच केलं. जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न असताना त्यांनी अशा पद्धतीने वागू नये. त्यामुळेच सर्व आमदारांनी एकमताने या बैठकीत त्यांच्या निषेधाचा ठराव केला आहे.