महाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेणारे 70 हजार मजूर कुठून आले ? आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत सवाल

मुंबई दि-24 जळगाव जिल्ह्यात एका वर्षामध्ये 70 हजार बांधकाम मजूर भर उन्हामध्ये काम करत होते. जळगाव जिल्हाधिकारी यांच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात एक ब्रासदेखील वाळू वर्षभरात दिली गेली नाही, म्हणजे बांधकाम पूर्णपणे बंद आहेत.मग मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेणारे हे 70 हजार बांधकाम मजूर आले कुठून ? असा प्रश्न उपस्थित करत आ. एकनाथराव खडसेंनी सभागृहात भ्रष्टाचाराबाबत ची लक्षवेधी सूचना मांडली आहे.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात मध्यांन्ह भोजन योजनेत मोठा भ्रष्टाचार असून राज्यातील 14 कोटी जनतेपैकी सव्वा चार कोटी लोकं हे मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेत शासनाच्या आकडेवारीवरून दिसतोय; विशेष म्हणजे दिल्लीतील सेंट्रल व्हीस्टा बांधायला 3 वर्षात 23 हजार बांधकाम मजूर लागलेले आहेत.असे आणखीही काही पुरावे माझ्याकडे असून त्याची चौकशी करण्याची मागणी एकनाथराव खडसेंनी केली होती.

कामगार मंत्र्यांचे उत्तर !

इमारत व इतर बांधकाम व्यवसाय मधील  बांधकाम कामगारांसाठी, १ जुलै 2023 पासून नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत जेवण वितरित करण्यात येते, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील  बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते.

            कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले की, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळेचे जेवण पुरविण्यात येते. कोविड काळात बांधकाम कामगारांसोबत नाका कामगार आणि नोंद नसलेल्या कामगारांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्यात संघटित २६ लाख ३८ हजार नोंदणी कामगार असून तीन कोटी ५४ लाख असंघटित कामगार आहेत. कामगाराची  नोंदणी करण्याचे काम अद्यापही सुरू असून याबाबत कोणाच्याही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी  करू. यामध्ये दोषींवर कारवाई करू. विविध सदस्यांनी केलेल्या सूचनांसाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल.

            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अभिजित वंजारी, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031
Back to top button