Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावनोकरीपुणेमहाराष्ट्रमुंबई

आता सर्व पोलिसांना दुचाकी चालवितना हेल्मेटचा वापर सक्तीचा उल्लंघन केल्यास कारवाईची नोंद थेट ‘सर्व्हिस बुका’त होणार,पोलीस महासंचालकांचे आदेश

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सेवापुस्तकेत नोंद होईल

मुंबई, 10 एप्रिल 2026 – महाराष्ट्र राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात प्रविण साळुंके ,अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी सर्व युनिट्सना आदेश जारी केले आहेत.
या आदेशात नमूद केल्याप्रमाणे, मागील काही वर्षांत दुचाकी अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. विशेषतः डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
मुंबई-नागपूर पुढे, इतर जिल्ह्यांत कमी वापर
Bloomberg Philanthropies Initiative for Global Road Safety अंतर्गत केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई आणि नागपूर शहरांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. मात्र इतर शहरे व जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अत्यंत कमी असून, काही ठिकाणी 20 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनीच नियम पाळण्याचे निर्देश
या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीसांनी आदर्श निर्माण करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
उल्लंघन केल्यास कारवाई
मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर, हेल्मेट न वापरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच, अशा उल्लंघनाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दंडाची रक्कम न भरणाऱ्या संबंधित पोलिसांच्या सेवा पुस्तकेत दंडाच्या रकमेची नोंद केली जाईल, असे सक्त आदेश देण्यात आले आहे.
सर्व युनिट्सना सूचना
हा आदेश मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांनाही याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे रस्ते सुरक्षेबाबत पोलिसांची जबाबदारी अधिक ठळकपणे समोर आली असून, नागरिकांमध्येही हेल्मेट वापराविषयी जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
POLICE नंबर प्लेट वरही
खाजगी चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट लावण्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण स्पष्टता दिली आहे. संबंधित प्रकरणात न्यायालयाने असे नमूद केले की, विशिष्ट तपास कार्यासाठी व परिस्थितींमध्ये आणि ठरावीक अटींचे पालन केल्यास पोलिस अधिकारी आपल्या खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी ओळख दर्शवणारी नेमप्लेट लावू शकतात.
काय आहे प्रकरण?
अनेक ठिकाणी पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या खाजगी वाहनांवर ‘Police’ किंवा ‘पोलीस’ असे लिहून फिरत असल्याचे आढळते. यावरून सामान्य नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत होते की, हे कायदेशीर आहे का? या पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की:
पोलिस अधिकारी हे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकृत कर्मचारी असल्याने, काही प्रसंगी त्यांची ओळख पटणे आवश्यक असते. त्यामुळे, अधिकृत कर्तव्य बजावताना किंवा आवश्यकतेनुसार ओळख दर्शवण्यासाठी ‘Police’ नेमप्लेट वापरण्यास परवानगी असू शकते.
मात्र अटीही लागू
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की ही मुभा अमर्यादित नाही. काही महत्त्वाच्या अटी पुढीलप्रमाणे:
खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ नेमप्लेटचा वापर केवळ अधिकृत तपासकार्याच्या कामासाठीच असावा.
या नेमप्लेटचा गैरवापर करून विशेष सवलती (जसे की वाहतूक नियम मोडणे, टोल टाळणे इ.) घेता येणार नाहीत.
सर्वसामान्य नागरिकांनी अशा प्रकारची नेमप्लेट लावणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp