Advertisement
क्राईम/कोर्टजळगाव

भुसावळात कुत्र्याने हल्ला केलेल्या जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू, नगरपरिषद प्रशासनावर संताप ! खन्ना कोळीच्या घरातून ५ कुत्री जप्त

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे प्रशासनाकडून उल्लंघन

भुसावळ, दि-13/05/26 भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नारायण नगर परिसरात विद्यार्थ्यांवर कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना २४ एप्रिल रोजी घडली होती. तारकेश विशाल झोपे वय 9 वर्षे हा सकाळी शाळेत जात असताना या विद्यार्थ्याला कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले होते या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या आधी त्याच्यावर सध्या जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटल डॉ. श्रीराज महाजन यांच्याकडून उपचार सुरू होते या मुलाला प्लास्टिक सर्जरीची गरज असल्याने आणि त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. या घटनेमुळे मुलाच्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला असून, रहिवाशांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये चिंता आणि संतापाची लहर उसळली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी श्वानगृह स्थापन करण्याची डेडलाईन घालून दिली होती. मात्र भुसावळात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासन कारवाई करत नसल्याने भविष्यात मयत विद्यार्थ्याच्या पालकांकडून संबंधित कुत्रा मालक आणि नगरपालिका प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली जाऊ शकते.
उपचारा दरम्यान मुलाला 80 टाके पडलेले होते, असे समजले असुन आता मुंबईत उपचार सुरू होते.
शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, म्हाडा कॉलनी चितोळे मंगल कार्यालय, गणेश कॉलनीसह अनेक परिसरांमध्ये कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असून लहान मुले, महिला, वृद्ध आणि वाहनचालक यांना धोका निर्माण झाला आहे.
या वाढत्या घटनांमुळे रेबिजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अस्वच्छता आणि वाढती घाण यामुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळत असून त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. वारंवार मागणी करूनही नगरपालिकेचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान याच परिसरातील रहिवासी प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्यानेच हा जीवघेणा हल्ला केल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती करणाऱ्या महिलांना खन्नाने अश्लील शिविगाळ केल्याचा आरोप संतप्त महिलांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासमोर केला आहे. यावेळी खन्नाच्या घरातून नगरपरिषद कर्मचारी , दिपक बारसे व त्यांच्या मित्रांनी पाच कुत्रे मोठ्या शिताफीने पकडून गाडीत जमा करून आता त्यांना दूर जंगलात सोडणार आहे. यावेळी संतप्त नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
रहिवाशांनी मागणी केली आहे की:
आक्रमक मोकाट कुत्र्यांना पकडून श्वानगृहात टाकावे.
नियमित श्वान नसबंदी मोहिमा राबवाव्यात.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp