मुक्ताईनगरात नकली नोटा जप्त, पोलिसांच्या पहाटेच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त, वन्यजीवांचे कातडे व कथित नागमणी जप्त
Dysp केदार बारबोले आणि LCB प्रभारी गायकवाड यांच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : जळगाव पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील लाळमगोठा, हलवेडा, मथपुरी, जोगेंद्रखेडा व चारठाणा परिसरात सुरू असलेल्या कथित “ट्रॅप केस” आणि विविध गंभीर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी १९ जून २०२६ रोजी पहाटे मोठी धाडसत्र मोहीम राबविली. या कारवाईला पोलिसांनी “सर्वात मोठी आणि यशस्वी सर्जिकल स्ट्राईक” असे संबोधले आहे. गेल्या काही वर्षांपासून कथित नागमणी च्या माध्यमातून नोटांचा पाऊस पाडण्यासंदर्भात अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते.
ट्रॅप केसची कार्यपद्धती
पोलिसांच्या माहितीनुसार, कमी लोकसंख्या असलेल्या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. काळे हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, पांढरा बिब्बा, उलटी वासने, सुलेमानी दगड, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ व्हायरल करून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

लोक गावात पोहोचल्यानंतर त्यांना नकली नोटा, बनावट किंवा कमी किमतीच्या वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मागील तीन वर्षांतील गुन्ह्यांचे चित्र
दरोडा – १०, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे – १
खून – १, जबरी चोरी – ७, फसवणूक – २६
दंगलीचे प्रकार – , सरकारी नोकरावर हल्ला – २
आरोपी व जप्त मुद्देमाल
१) फरेज राजू पवार (वय ४०, रा. मथपुरी, ता. मुक्ताईनगर) गुन्हा क्र. २५८/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५
जप्त मुद्देमाल :
१० हजार रुपये किंमतीचा लाकडी मुठ असलेला लोखंडी रिव्हॉल्वर
रिव्हॉल्वरमध्ये भरण्यासाठी ४ जिवंत काडतुसे
५०० रुपये किंमतीचे आणखी एक जिवंत काडतूस
२) रामजने रायसिंग भोसले (वय ३२, रा. हलवेडा, ता. मुक्ताईनगर)
गुन्हा क्र. २५९/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५
जप्त मुद्देमाल :
४० हजार रुपये किंमतीचे काळ्या मुठीचे व चंदेरी रंगाचे बॅरल असलेले लोखंडी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे
२०० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या “CHIDREN BANK OF INDIA” या बनावट नोटांचे दोन बंडल (एकूण २० हजार रुपये)
३) आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२, रा. हलवेडा)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४

जप्त माल :
रोख रक्कम – ६ लाख ५७ हजार रुपये
१७ मोबाईल फोन – अंदाजे १ लाख ३० हजार रुपये
सोन्या-चांदीचे दागिने – ३६ लाख रुपये
४) रोहित सुरेश पवार (वय ३२, रा. मथपुरी)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४
जप्त माल : रोख रक्कम – १४ लाख रुपये
सोन्या-चांदीचे दागिने – २ लाख रुपये
५) भारतीय न्याय संहिता कलम ३२०(४) अंतर्गत आरोपी
- राजकिरण जोगिंदर भोसले
- दया जोगिंदर भोसले
- शिवकिरण जोगिंदर भोसले
- आक्काबाई जोगिंदर भोसले
- जोगिंदर राजवंती भोसले
(सर्व रा. हलवेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)
६) वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम ९
आरोपी : गांधी दरियासिंग भोसले (रा. हलवेडा)
जप्त : हरणाचे २ कातडे, कोल्ह्याचे १ कातडे, सशाचे (Rabbit) १ कातडे
७) बीएनएस कलम ३२९ अंतर्गत अटक
विलास नर्वीलाल पवार (रा. हलवेडा) यास अटक करण्यात आली.
८) भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२)
अनय दादा पवार (रा. हलवेडा) यास अटक करण्यात आली.
एकूण जप्त मुद्देमाल
रोख रक्कम : २० लाख रुपये
सोन्याचे दागिने : ३०० ग्रॅम (अंदाजे ३० लाख रुपये)
चांदीचे दागिने : ४ किलो (अंदाजे ८ लाख रुपये)
दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे
हरण, कोल्हा व सशाची कातडी
चार चारचाकी वाहने
सहा दुचाकी वाहने, ३० मोबाईल फोन
कारवाईत सहभागी वरिष्ठ अधिकारी
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कोम्बिंग ऑपरेशन कारवाई राबविण्यात आली.
या मोहिमेत :
उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ
पोलीस निरीक्षक केदार बारबोले (भुसावळ,मुक्ताईनगर)
परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत देशकर
पो.नि. राहुल गायकवाड (एलसीबी)
पो.नि. महेश गायकवाड (भुसावळ शहर)
पो.नि. निलेश गायकवाड (भुसावळ तालुका)
पो.नि. राहुल वाघ
पो.नि. आशिष लव्हांळे
सपोनि. विशाल पाटील (सावदा)
सपोनि. योगिता नासरेडे (नशिराबाद)
सपोनि. मीरा देशमुख (निंभोरा)
सपोनि. अमित कुमार बागुल (वरणगाव)
यांच्यासह सुमारे २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
विशेष बाब
पहाटेच्या या धडक मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून विविध गुन्हेगारी प्रकारांमुळे चर्चेत असलेल्या परिसरात पोलिसांनी मोठा धाक निर्माण केला असून,नागमणी, फसवणूक, बनावट नोटा, बेकायदेशीर शस्त्रे आणि वन्यजीव तस्करीविरोधातील ही जळगाव पोलिसांची अलीकडच्या काळातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.













