Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली, राज्य सरकारने ९ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या जाहीर

श्रीकांत ढिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक

मुंबई, २० एप्रिल २०२६:महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज पोलीस अधीक्षक (SP) स्तरावरील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. शासन आदेश क्र. आयपीएस-२०२६/प्र.क्र.४०/पोल-१ दिनांक २०.०८.२०२६ नुसार विविध जिल्ह्यांमधील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
प्रमुख बदल्या खालीलप्रमाणे:
-तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
-निखिल पिंगळे यांची पुणे येथील उप आयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
-संदीप घुगे यांची सांगली येथील पोलीस अधीक्षक पदावरून पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात उप आयुक्त (सुरक्षा) म्हणून बदली झाली आहे.

  • योगेश गुप्ता यांची कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक पदावरून गडचिरोली येथे उप महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अतिरिक्त प्रभारासह नियुक्त केले आहे.
    -निलोत्पल यांची गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक पदावरून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली.
  • एम. रमेश यांची गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक पदावरून गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती/बदली.
  • महेश्वर रेड्डी यांची जळगाव येथील पोलीस अधीक्षक पदावरून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती.
    श्रीकांत धीवरे यांची धुळे येथील पोलीस अधीक्षक पदावरून जळगाव येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली.
    -राजकुमार शिंदे यांची पुणे येथील उप आयुक्त पदावरून वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती.
    या बदल्यांमुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनात बदल होणार आहेत. विशेषतः नक्षल प्रभावित गडचिरोली परिक्षेत्रात योगेश गुप्ता यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याने त्या भागातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे.
    ही बदली महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९९९ च्या कलम २२ (न) आणि २२ (२) अंतर्गत करण्यात आली असून, यामुळे पोलीस दलातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे गृह विभागाचे म्हणणे आहे.
अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp