मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ट्रान्सजेंडरसोबतचा शासकीय बंगल्यातील कथित ‘डर्टी पिक्चर’ समोर,मद्यपान व अनैतिक व्यवहाराचे आरोप
उद्याच राजीनामा होण्याची शक्यता ?

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात आधीच अशोक खरात भोंदूबाबाच्या कुकर्मांची आणि त्याला भेटण्यासाठी गेलेल्या राजकीय नेत्यांची प्रसार माध्यमांसह विधीमंडळात जोरदार सुरू असताना महाराष्ट्रात राजकारणात खळबळ उडवणारा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक ट्रान्सजेंडर व्यक्ती पवन यादव यांच्यासोबतचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. या व्हिडिओमध्ये शासकीय निवासस्थान (बंगला) येथे मद्यपान व अनैतिक व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील काही राजकारण्यांना आधीच बाबाबुवांच्या भोंदूगिरीचा विळखा पडलेला आहेच, आता या कथित व्हिडिओ क्लिपमुळे स्वतः सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. महाराष्ट्रातील मंत्रालयात बसणारे आणि नैतिकतेच्या गप्पा मारणारे काही कथित राजकारणी व्यभिचारी आहेत का ? की त्यांना जाळ्यात अडकवून त्यांचा डर्टी पिक्चर बनवला जातोय ? महाराष्ट्र आता थांबणार नाही… अनेकांचे पिक्चर बाहेर काढणार ? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडू लागला आहे.

वृत्तानुसार, हा व्हिडिओ पवन यादव यांचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचे सांगितले जाते. पवन यादव ट्रान्सवूमन आहेत आणि त्यांच्यावर खंडणी व दमदाटीचे आरोप आहेत. मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात इतर काही मंत्र्यांची नावेही पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग झाल्याचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी सरकारी सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षातही या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
अद्याप मंत्री नरहरी झिरवाळ किंवा महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विरोधी पक्षांतील महिला नेत्यांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची आणि उद्यापासून विरोधक सरकारवर विविध आरोप करून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात. यामुळे राज्यात नवीन राजकीय वाद आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यातच आता हे प्रकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाला अडचणीत आणणारे ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.












