सावदा सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये अवैध दारुची विक्री, सावदा पोलीसांत गुन्हा दाखल
दुधडेअरीत अवैध दारू विक्रीची पहिलीच घटना

भुसावळ दि.25/03/2026 , सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सावदा शहरातील सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये एक इसम याने विदेशी दारु विक्री करीता आणली असुन ती दुध डेअरीमधील मागील रुममध्ये विक्री करीता ठेवलेली आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष छापा कारवाई केली असता सदर दुध डेअरीमध्ये असलेल्या किचन रुममध्ये एका बॉकसमध्ये 750 एम एलच्या 09 सिलबंद बाटल्या 13,500/- रु कि च्या मिळुन आल्यात सदरच्या बाटल्या हया सदर संस्थेमधील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे वय-46 वर्षे रा.सावदा ता.रावेर याने विक्रीसाठी आणल्या असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरोधात सावदा पोलीस स्टेशन येथे गुरनं 76/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा सपोनि विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ 1239 उमेश पाटील हे करीत असुन सदर दारु विक्रीमध्ये संचालक मंडळाचा काही सहभाग आहे काय त्याबाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई ही मा.वरीष्ठाांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ 1239 उमेश पाटील, पोना 2474 जाकीर मन्सुरी , पोकॉ 323 मयुर पाटील यांनी केली आहे.












