Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दिपमाला काळे तरउपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड जाहीर

जळगाव ,दि-02/02/2026 – जळगाव जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत एका हाती सत्ता स्थापन केली आहे. यात भाजपने सर्व 46 जागांवर विजय मिळवत 100% स्ट्राईक रेटने जिंकलेल्या आहेत. आज महापौर पदासाठी सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिपमाला काळे यांची तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा जळगाव महापालिकेवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.
विकासाचा अश्वमेध जळगावात आणू
जळगाव शहरातील प्रलंबित विकासकामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवक सर्वोत्तम कामगिरी करून नावारूपाला येणारे शहर विकसित करू अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
याप्रसंगी जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आमदार चंद्रकांत सोनवणे, मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button