Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

ड्रग्स प्रकरणी बबन आव्हाडांचे निलंबन दृष्टीपथात ? आ.चंद्रकांत पाटलांसह 2 पाटील आमदार सभागृहात आक्रमक, इतर आरोपींचेही CDR बाहेर आल्यास मोठा भूकंप होण्याची शक्यता ?

पोलिस दलात 'ज्युनिअर सचिन वाझे' कार्यरत ?


मुंबई, दि. १७ जुलै : जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील अमली पदार्थ (ड्रग्स) विक्री प्रकरणात सर्फराज जावेद भिस्ती यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक पोटे यांनी भान न ठेवता तब्बल ३५२ वेळा आरोपींना संपर्क केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली.  मात्र इतर आरोपींचेही सीडीआर रिपोर्ट बाहेर आल्यास त्यात १६ (ज्युनिअर सचिन वाझे) संशयित गोत्यात येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. यामुळे जळगाव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडालेली असून, याप्रकरणी आता जळगाव आणि भुसावळ शहरातील पोलीस दलातील काही जणांची धाकधूक वाढल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचाभुसावळात एमडी ड्रग्स जप्त, जळगावचे Dysp यांच्या पथकाने भुसावळ शहरातून दोघांना घेतले ताब्यात

मुक्ताईनगरचे विधानसभा सदस्य चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी आज यासंदर्भात अत्यंत आक्रमकपणे लक्षवेधी सूचना मांडून  सभागृह दाणाणून सोडलं आहे. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पीएसआय पोटे यांना निलंबित केले, मात्र त्यांचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी असलेले आणि आता जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे स्थानिक गुन्हे शाखेत निरिक्षक असताना त्यांच्या आशीर्वादानेच ड्रग्स रॅकेट चालू असल्याचा दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे बबन आव्हाड यांना आजच तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी सभागृहात लावून धरली होती. या लक्षवेधी चर्चेत त्यांना पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील आणि अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी साथ देत या आमदारांनी अत्यंत आक्रमकपणे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यावर तात्काळ निलंबित करण्याची कारवाई व्हावी, म्हणून सभागृहात आक्रमकपणे आवाज उठवला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील आमदार असलेल्या तीन पाटलांनी एकत्र येऊन अचानक एका पोलीस निरीक्षकावर निलंबनासाठी आक्रमकपणे जोरदार हल्लाबोल केल्याचे चित्र आज सभागृहात दिसून आले आहे.तब्बल अर्धा तास चाललेल्या या चर्चेनंतर मंत्री पंकज भोयर म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची आठ दिवसांत चौकशी करून चौकशीमध्ये जर दोषी आढळले तर त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात दिली आहे.
याप्रकरणी विभागीय चौकशी सुरू – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी
दरम्यान, याप्रकरणी यापूर्वी जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी अंतर्गत चौकशी केली होती, त्यानंतर भुसावळ येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनीही खातेनिहाय चौकशी केली होती, आता पोटे याची चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यामार्फत विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेली असून पुढील आठ दिवसात त्याचा अहवाल येणार असल्याचे सूतोवाच केलेले आहे.
पालकमंत्र्यांची शिफारशीने LCBचे PI झाले होते ?
गेल्या वर्षी बबन आव्हाड हे एमआयडीसी पोलीस ठाण्यातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी विराजमान झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र आता ड्रग्स प्रकरणामुळे त्यांची आणि जिल्हा पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाल्याने त्यांची तात्काळ पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले होते. मात्र त्यांच्या हाताखालील राईट हॅन्ड असलेल्या पीएसआय पोटेला निलंबित करण्यात आलेले होते. बबन आव्हाड यांनी यापूर्वी भुसावळ बाजारपेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्या सारख्या मलाईदार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पद भुषविले असल्याचा आरोप आज सभागृहात करण्यात आलेला आहे. त्यामुळे याप्रकरणाची आता संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू झालेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button