Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाकरी फिरवली, जळगाव एलसीबीच्या प्रभारीपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

ड्रग्स सिंडिकेट तोडण्याचे आव्हान

जळगाव,दि-02/06/2025 , गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये बदलांचे वारे वाहत असून आतापर्यंत 600 च्या वर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आज काही पोलीस निरीक्षक यांची प्रशासकीय कारणास्तव जिल्हा अंतर्गत बदली करण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल,पीएसआय दर्जांच्या अधिकाऱ्यांची विनंतीनुसार बदली करण्यात आलेली होती, तर काहींची नाकारण्यात येऊन जैसे थे करण्यात आलेली होती. आज देखील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी 14 अधिकाऱ्यांची जिल्ह्यांतर्गत पोलीस ठाणे प्रभारी म्हणून बदलीचे आदेश पारित केलेले आहे.
एलसीबीला नवा चेहरा
जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलातील सर्वात प्रतिष्ठित अशा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पदी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा विशेष शाखेत सुद्धा पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना शासनाचा उत्तर महाराष्ट्रातून सर्वोत्तम पोलीस निरीक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला होता. अशा मनमिळावू, संयमी स्वभावाचे, मात्र गुन्हेगारांसाठी सतत कर्दनकाळ ठरलेल्या मोजक्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संदीप पाटील यांची गणना केली जाते. अआज त्यांचा गुन्हेगारांमध्ये आदरयुक्त दरारा निर्माण झालेला आहे. त्यांची खाकीशी निष्ठावान आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून केलेल्या कर्तुत्वाची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दखल घेऊन बबन आव्हाड यांच्या जागी त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून देखील विशेषाधिकार असतात. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कारवाई करण्याची आणि तपास करण्याची शक्ती ही स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींकडे असते. त्यामुळे या पदाला पोलीस दलात खूप मोठे महत्त्व असते. या पदासाठी अनेक पोलीस अधिकारी राजकीय पाठबळ मिळवून रूजू झाल्याचा इतिहास आहे.मात्र कोणतेही राजकीय पाठबळ नसताना आणि वशिला नसतांना स्वतःच्या कर्तुत्वावर एलसीबीच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याने आता ड्रग्स रॅकेट मधील गुन्हेगारांशी असलेल्या संपर्कामुळे बदनाम झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेला पुन्हा शिस्त लावून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संदीप पाटील यांची अग्नीपरीक्षा राहणार आहे. आणि ते त्यात नक्कीच यशस्वी व्हावेत अशीच जळगाव जिल्ह्यातील सजग नागरिकांची इच्छा आहे. या आधीच एलसीबीतील 17 पोलीस कॉन्स्टेबल यांच्या बदल्या जिल्ह्यात इतरत्र करण्यात आलेल्या आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button