
भुसावळ दि-२६/११/२५, भुसावळ शहरातील स्वतंत्र भारत परिवार हा देशाच्या राज्याच्या व शहराच्या विकासाकरता निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न करता काम करतो, स्वतंत्र भारत परिवारात कोणताही भेदभाव जसे की जात-पात गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित महिला पुरुष असा कोणताही भेदभाव मानत नाही. मागील लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भुसावळ शहर व परिसरात स्वतंत्र भारत परिवाराच्या साधारणपणे साडेपाचशे सदस्यांनी काही हजार मतदान राष्ट्रीय हिताकरिता करायला लावले त्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न केले, आता सध्या भुसावळ येथे नगरपालिका निवडणुकांचे पर्व सुरू आहे, यामध्ये भुसावळच्या विकासाकरता सुशिक्षित व सुसंस्कृत आणि स्वच्छ चारित्राच्या उमेदवारासोबत काम करावयास तयार असून अशा उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात येणार आहे. तरी भविष्यात भुसावळ शहर विकासाच्या दृष्टीने पुढे जावे म्हणून खालील मागण्या केलेल्या आहेत. तरी या शहराच्या विकासाभिमुख मागण्यांचा विचार करून आपण त्याच्यावर विचार करून जास्तीत जास्त मतदान करून भुसावळच्या विकासात सहभाग व्हावे.असे आवाहन संघटनेचे रितेश जैन , मुन्ना ठाकूर, चंद्रशेखर पाटील, उमेश पाटील, कैलास चव्हाण, दिनेश दोधानी यांनी उमेदवारांसह भुसावळकर मतदारांना केलेले आहे.
१- गेली अनेक वर्षे भुसावळकर पाण्याकरता बारा बारा दिवस वाट पाहतात हे योग्य नाही लवकरात लवकर दररोज भुसावळकरांना पाणी मिळेल याची व्यवस्था आपण लावावी.
२- कंत्राट नगरसेवकांना न देता योग्य अशा कंत्राटदारांना देऊन त्यांच्याकडून टिकतील असे रस्ते व इतर बांधकाम करून घ्यावेत ठेकेदार चे नाव मोबाइल नंबर सार्वजनिक करावे, तसा बोर्ड तेथे लावावा.
३- भुसावळ येथे रोजगार च्या संधि वाढाव्यात म्हणून एमआयडीसीमध्ये नवीन प्रकल्प आणण्याचा पुरेपूर प्रयत्न
करावा व प्रकल्पांना जे कोणी त्रास देत असतील त्यांचा योग्य बंदोबस्त करून पोषक वातावरणाची निर्मिती करावी
४- भुसावळ मध्ये गुरांकरता गोशाळे करता कृपया गोरक्षकांना जागा उपलब्ध करून द्यावी
५- भुसावळ मध्ये जे काही अवैध कत्तलखाने उघड्यावर मास विक्री सुरू आहे ती त्वरित बंद करण्यात यावी
६- भुसावळच्या सर्वांगीण विकासाकरता भुसावळ जिल्हा ची निर्मिती करण्याकरता पूर्ण पाठपुरावा करावा
७- भुसावळचा विकासाचा एक योग्य असा आराखडा तयार करून सुटसुटीत रस्ते, सुशोभित चौक कारंजे इत्यादी ची सुविधा करावी
८- भुसावळ परिसरातील होणारे स्थलांतर हे चिंतेचे कारण आहे हे थांबवण्याकरता भुसावळ परिसरात उत्तम शैक्षणिक संस्था, शेतीच्या विकासाकरता विविध प्रकल्प, औद्योगिक विकास इत्यादीं करता पुरेपूर काम करावे.
९- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भुसावळ मधील सुजाण आणि सन्माननीय नागरिकांच्या सर्वसामान्यांच्या जनसंपर्कात कायम सोबत राहावे
१०- भुसावळचे स्थलांतराचे एक प्रमुख कारण म्हणजे येथील गुन्हेगारी तिच्या नायनाट करण्याकरता जे जे करता येईल ते सर्व करून त्यांचा योग्य तो कार्यक्रम निश्चित करावा.
११- भटके कुत्रे / भटके ढोर यांचा योग्य तो बंदोबस्त करावा
१२-तापी नदी पुलावर अनेक आत्महत्या झाल्या असून त्या रोखण्याकरता जाळी ची व्यवस्था करावी
१३-नाहाटा चौफुली जवळील जुनी पाण्याची टाकी धोकेदायक स्थितीत असून ती लवकरात लवकर पाडली जावी
१४-नगरपालिका चे कार्यक्षेत्रात नगरपालिकेची नवीन सुसज्ज इमारत अत्याधुनिक अॅम्बुलन्स आणि शववाहिनी
उपलब्धता करावी
१५-भुसावळ नगरपालिका कार्यक्षेत्रात तीन वर्ष शासकीय सेवा बजावल्यानंतर त्या शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र बद्दल व्हायला हवा व्हायला हवे.
१६-नॅशनल हायवे, रेल्वे, नगरपालिका, एमआयडीसी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्याद्वारे वृक्ष लागवड व त्यांची पूर्ण वाढ होईस्तोवर संगोपन करून घ्यावे.
१७- संभाजी महाराजांचा प्रस्तावित स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे
१८-ज्यांच्याकडे बोरवेल आहे त्यांना, वॉटर हार्वेस्टिंग ची सक्ती करावी
१९-नगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर अभ्यासिका किमान 500 विद्यार्थ्यांची क्षमतेची निर्मिती करावी
२०-नगरपालिका द्वारे सेमी इंग्लिश शाळा कार्यान्वित करावे
२१-नगरपालिका ने आयटीआय चे प्रस्ताव ठराव
२२-STP- Sevage treatment plan for whole city म्हणजेच नदीला जाणाऱ्या दूषित पाण्याला प्रक्रिया करून
नदीत सोडले जेणेकरून जल प्रदूषण होणार नाही सोबतच रेल्वे, दीपनगर, ऑडनस फॅक्टरी व कंडारी ग्रामपंचायत वरणगाव ग्रामपंचायत इत्यादींना ही सक्ती करावी
२३-शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फ्रुट मार्केट, खाऊ गल्ली, नॉनव्हेज मार्केट इत्यादी तयार करून बाकी ठिकाणचे अतिक्रमण सक्तीने हटवावे
२४- नदीचा घाट विकसित करून भुसावळ मध्ये नवीन पर्यटन स्थळ विकसित करावे गरज पडल्यास उदयपूरचा फतेह सागर लेक चा परिसर पहावा वरील सर्व कामे लोकप्रतिनिधी पुढील पाच वर्षात करावी याकरिता स्वतंत्र भारत परिवार काम करेल.













