Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईरंजक माहिती

भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यात आज १ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद, भुसावळ येथील घटनेच्या निषेधार्थ मद्यविक्रेते आज निवेदन देणार

भुसावळ ,दि-२५/०६/२५ , भुसावळ- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव जवळील हॉटेल वरूण येथे दारूची बाटली दिली नाही, म्हणून तरूणांच्या टोळक्याने मालकावर काचेची बाटली मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी भुसावळ शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने आज दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवून निषेध नोंदवून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या मद्य व्यावसायिकांतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती भुसावळ येथील मद्य विक्रेता अजय धाग्यांनी यांनी दिली आहे. भुसावळ शहरातील सकाळी उघडणारी मद्याची दुकाने अचानक बंद दिसून आल्याने ‘ उतारा ‘ न झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या मद्यप्रेमींमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
दारूची बाटली न दिल्याच्या रागातून साकेगाव येथील वरुण हॉटेलमध्ये व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता हॉटेलमध्ये तोडफोड करून २५ हजार रुपयांची लूट केली. २३ जूनच्या रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार झाला. या हल्ल्यात जखमी व्यवस्थापकाच्या डोक्यावर तब्बल २६ टाके घालावे लागले आहेत. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक सुमित सुभाष इंगळे रा. न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादवरून संशयित आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिली. त्यानुसार संशयित कुणाल अहिरे याला रविवार दि.२२ जून रोजी दारूची बाटली दिली नाही. याचा राग मनात धरून कुणालने सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी व इतर ८ ते १० साथीदारांना सोबत आणून २३ जूनच्या रात्री ८.३० वाजता हॉटेलवर हल्ला केला. कुणालने हॉटेलचे व्यवस्थापक सुमित इंगळे यांच्या डोक्यावर काचेची बाटली मारून गंभीर जखमी केले. अन्य संशयितांनी तोडफोड केली. हॉटेलच्या गल्ल्यातील सुमारे २५ हजार रुपये हिसकावून घेतले. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर मशीन सोबत घेऊन पळ काढला. जखमी सुमित इंगळे यांच्या डोक्यावर २६ टाके घालावे लागले. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button