भुसावळात शिक्षकांच्या नुतन सह.पतपेढीत मागील काळात सुमारे १,९३,८६,२५० रु.चा अपहार उघड,१० आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

भुसावळ दि- २२/०६/२०२५, भुसावळ शहरात असलेल्या प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ या नामांकित पतपेढीत सभासदांची नावे वापरून गैरसभासद यांचे नावावर १,२३,८६,२५०/- रुपये वर्ग केल्याचा अपहार समोर आलेला आहे.यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली असून , त्याबाबत पतपेढीचे नुतन सभापती प्रदीप सोनवणे सर यांनी पोलिस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन, भुसावळ आणि पोलीस अधीक्षक , जळगाव यांचेकडे फिर्याद सादर केली आहे. पतपेढीची निवडणूक मागील एप्रिल महिन्यात होऊन मे महिन्यात नूतन कार्यकारी संचालक मंडळ अस्तित्वात आले होते. पतपेढीचे सभापती प्रदीप सोनवणे, सभापती यांनी व त्यांचे सोबत उपसभापती व सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनी कामकाजाला सुरुवात करताच पहिल्या कर्ज वितरणात मागील सन २०२३-२४ आणि सन २०२४-२०२५ या दोन आर्थिक वर्षात झालेला १,९३,८६,२५०/- रुपये इतक्या रकमेचा घोटाळा समोर आणला आहे. यामध्ये संस्थेचे लिपिक- अभिजीत दतात्रय तायडे, चिटणीस व हिशोबनीस राजू लालू गायकवाड, आरटीजीएस फाइल तयार करणारे कर्मचारी हितेश संजय नेहेते, तत्कालीन सभापती गंगाराम सीताराम फेगडे व हरिश्चंद्र काशिनाथ बोंडे आणि ज्या सभासद नसलेल्या निलेश रविंद्र महाजन, हर्षल सुनिल गावंडे, कुणाल संजय महाजन, हर्षल रविंद्र चौधरी, रुपाली अभिजीत तायडे या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. असे एकूण १० व्यक्तींवर सदर फिर्याद दिलेली आहे. सदर फिर्याद दि. १७/०६/२०२५ रोजी दिलेली असून अद्याप पावतो पोलिसांमार्फत याची चौकशी सुरू झालेली नाही. दि. २२/०६/२०२५ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत पतपेढीमध्ये मागील काळात झालेल्या अपहारमधील दोषी कर्मचारी आणि या झालेल्या अपहारातील कर्तव्यात कसूर करणारे दोषी कर्मचारी राजू लालू गायकवाड, पंकज मोतीराम ढाके, हितेश संजय नेहेते, जितेंद्र सुधाकर फेगडे, हितेंद्र अमोल वाघुळदे, राजेश देविदास लहासे, राहुल लक्ष्मीकांत चौधरी, अभिजीत दत्तात्रय तायडे, अजहरुद्दीन राजेंद्र तडवी, पंकज भागवत चौधरी या सर्व एकूण १० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबतचा ठराव घेतलेला असून त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे.
पतपेढीचे लेखापरीक्षण न झाल्याने तसेच झालेल्या लेखापरीक्षणास अतिविलंब झाल्याने हा अपहार घडल्याचे दिसत आहे. पतपेढीचे लेखापरीक्षण सन २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत झालेले नसल्याने, व झालेल्या लेखापरीक्षणावर सभासद बांधव आणि संचालक मंडळ साशंक असल्याने त्यासाठी त्या काळातील लेखापरीक्षण शासकीय लेखापरीक्षकामार्फत होण्यासाठी उपनिबंधक आणि लेखापरीक्षक सहकारी संस्था जळगाव यांचेकडे प्रस्ताव दि. ०९/०६/२०२५ रोजी सादर केलेला आहे.
दरम्यान, पतपेढीचा कारभार हाती घेतल्यापासून निवडणुकीत सहकार, लोकसहकार गटाने दिलेल्या वचननाम्याचा पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने केलेला आहे, त्यामध्ये पतपेढी मधील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आणि त्यांच्यावर प्रशासकीय स्वरूपाची गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणे हे वचन होते तसेच पतपेढी मध्ये कर्ज वितरणासाठी असलेली नंबर सिस्टीम बंद करणे हे मुख्य वचन पहिल्या दोन महिन्याच्या आत पूर्णत्वास आलेले आहे. आज रोजी मध्ये एकही कर्जाचा अर्ज प्रलंबित नाही आणि आलेल्या सभासदाला त्वरित कर्ज देण्यासाठी पतपेढी सक्षम आहे. त्यामुळे सभासद बांधवांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता, आपल्या पतपेढीबद्दल विश्वास कायम ठेवण्याबद्दलचे आवाहन सभापती, उपसभापती व संचालक मंडळांने केलेले आहे.
‘सन २०२०-२१ चे अतिविलंबाने झालेले लेखापरीक्षण
संशयाच्या भोवऱ्यात
तब्बल ५ वर्ष २०२०-२१ चे लेखापरीक्षण पी.पी.चौधरी यांनी अति विलंबाने केल्याने संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी या लेखापरीक्षणावर संशय व्यक्त करून यांनी अमान्य केलेले आहे. आणि २०२०-२१ चा अहवाल अप्राप्त असल्याने पुढील लेखापरीक्षक एम. व्ही. ढोले यांनी लेखापरीक्षण करण्यास असमर्थता दाखवली आहे.
संस्थेचे सन २०२३ – २४,२०२४-२५ चे लेखापरीक्षण न झाल्याने हा नवीन अपहार घडल्याचे समोर
या काळातील संस्थेचे लेखापरीक्षण झाले असते तर हा अपहार वेळीच पकडला गेला असता.त्यामुळे आता शासकीय लेखापरीक्षक यांच्याद्वारे लेखापरीक्षण करण्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केलेली आहे.
” सहकार लोकसहकार गटाची वचननाम्याची पूर्तता २ महिन्यातच “
पतपेढीचा कारभार हाती घेतल्यापासून निवडणुकीत सहकार, लोकसहकार गटाने दिलेल्या वचननाम्याचा पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने केलेला आहे, त्यामध्ये पतपेढी मधील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच पतपेढी मध्ये कर्ज वितरणासाठी असलेली नंबर सिस्टीम बंद करणे, यासारखी वचनपूर्तता पहिल्या दोन महिन्याच्या आत पूर्णत्वास आलेले आहे. आज रोजी मध्ये एकही कर्जाचा अर्ज प्रलंबित नाही आणि आलेल्या सभासदाला त्वरित कर्ज देण्यासाठी पतपेढी सक्षम आहे.
सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
ही पतपेढी शिक्षक सभासद बांधवांची माय माऊली आहे, कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीला पाठीशी घातले जाणार नाही, येत्या काळात पतपेढीला गतवैभव प्राप्त करून देण्यास मी व माझे संचालक मंडळ बांधील आहे. अशी प्रतिक्रिया श्री प्रदीप भिकारी सोनवणे, सभापती, प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळ













