
भुसावळ – नगरपालिकेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी प्रशासनाकडून कामकाजाची माहिती देण्यासाठी परिचय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नगरपालिकेतील विविध विभागांचे कार्य, जबाबदाऱ्या तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीची सविस्तर माहिती नगरसेवकांना देण्यात आली.
नवीन नगरपालिकेत बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नवविजयी नगरसेवकांनी मंगळवारी (दि. ३०) पालिकेला भेट देत प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. यावेळी गटनेते युवराज लोणारी यांनी सर्वप्रथम निवडून आलेल्या सदस्यांना विविध विभागांची रचना व कार्यपद्धती समजावून सांगितली.
सकाळी ११ वाजता जळगाव रोडवरील लोखंडी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळून नगरसेवक पालिकेकडे रवाना झाले. यानंतर पालिकेत जाऊन नव्या सदस्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
या वेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासोबत नव्या नगरसेवकांनी चर्चा केली.
भाजपच्या नगरसेवकांच्या भेटीमुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. नव्या सदस्यांना कामकाजाची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी यांचेसह नगरसेवक सर्वश्री निर्मल उर्फ पिंटू कोठारी,राजेंद्र आवटे,अनिता सतीश सपकाळे,प्रिती मुकेश पाटील, विशाल राजेंद्र नाटकर ,सोनम श्रेयस इंगळे, मेघा देवेंद्र वाणी, परीक्षित बऱ्हाटे, सोनल बापू महाजन, डॉ संगीता देशमुख, प्राची उदय पाटील,बोधराज चौधरी, गिरीश महाजन यांच्यासह इतर सर्व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.













