Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांच्या प्रचार मिरवणुकीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद

भुसावळ – नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून नगराध्यक्ष पदाच्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार किर्ती सुरेश वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ ‘अ’ आणि ४ ‘अ’ मधून सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची निशाणी घेऊन ते मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील बहुसंख्य महिला उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता.
दरम्यान ,याप्रसंगी आरपीडी रोडवरील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच घरोघरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार किर्ती वानखेडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button