
भुसावळ दि-04/05/2025, फैजपूर- भुसावळ मार्गावरील फैजपूर – आमोदा गावांच्या दरम्यान आज रविवार ४ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन अॅपे रिक्षांची जोरदार धडक होऊन मोठा भीषण अपघात झालेला आहे. या भीषण अपघातात सावदा येथील एका तरुणीचा जागीच मृत्यू झालेला असून इतर काही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.
दरम्यान, फैजपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा क्रमांक MH 19 CW 3590 ची रिक्षा प्रवासी घेऊन अमोदा गावाकडून फैजपूरकडे येत होती, तर रिक्षा क्रमांक MH 19 7064 ही मालवाहू रिक्षा फैजपूर कडून
आमोदा दिशेने जात होती. यात या दोन्ही रिक्षांची समोरासमोर अचानक जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सावदा येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलेले आहे.