Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी- नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची मागणी

यापूर्वीही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल

जळगाव-: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकवेळा सोशलमीडियावर अपमान करणाऱ्या विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या विकृत व्यक्तीने नाव आहे भूषण भास्कर पाटील, राहणार, डोंबिवली जिल्हा ठाणे यांनी  लाईव्ह फेसबुकवर  पाच वेगवेगळ्या वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या गौरवाविषयी जल्लोषी भाषा वापरून अपमान केला असून, या पूर्वी सुद्धा त्याच्यावर अशा वागणुकी मुळे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचा या विकृतीचा समाजात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे.
अशा या गंभीर प्रकरणी पत्रकारांच्या संघटनेच्या  नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने या आरोपीविरोधात तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. फोरमच्या पदाधिकारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेता, आरोपीच्या नार्को टेस्ट करण्याची मागणी करत, या घटनेमागील मुळ सूत्रधाराला शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव पवन घुले यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून, यात कठोर तपासणी आणि उचित कारवाई करून अश्या विकृत व्यक्ती आणि त्याच्या मागील बोलता सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी या व्यक्तीची नार्को टेस्ट घेण्यात यावी याबाबत चे निवेदन देण्यात आले.
      या निवेदनांत राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, जिल्हा महासचिव सुमित सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष प्राजक्ता तायडे, विनोद सोनवणे, देवदत्त मकासरे  यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
राज्यातून इतर पत्रकार सदस्यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला  आहे.या विषयावर स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदार सुरू आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button