Advertisement
जळगावनिवडणूकमुंबईराजकीय

मेहतर-वाल्मिकी समाजाची एकजूट! ममता अजय डागोर यांना पूर्ण ताकदीने जाहीर पाठिंबा; विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास

ममता अजय डागोर यांचा विजयाचा ठाम विश्वास

भुसावळ, दि. २९ नोव्हेंबर २०२५ : , भुसावळ नगरपालिकेच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार ममता अजय डागोर यांना प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ या प्रभागातील मेहतर-वाल्मिकी समाजाने एकदिलाने व एकजूट होऊन जाहीर पाठिंबा दिला असल्याचा दावा ममता अजय डागोर यांनी केला आहे. समाजाच्या या मोठ्या पाठबळामुळे ममता डागोर यांच्या प्रचाराला कमालीची ताकद मिळाली असून, त्यांनी आपला विजय आता शंभर टक्के निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.


मी सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन उतरले आहे. प्रचारादरम्यान घरोघरी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहता विजय आमचाच आहे,” असे ममता अजय डागोर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक अजय कुमार डागोर व आकाश डागोर यांच्या जनहिताच्या सातत्यपूर्ण कामामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. वार्डातील मेहतर-वाल्मिकी समाजाच्या या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार ममता अजय डागोर यांच्या प्रचाराला आणखी भक्कम बळ मिळालेले आहे.

या पाठिंबा जाहीर करण्याच्या कार्यक्रमात मेहतर-वाल्मिकी समाजाचे प्रमुख नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात कैलास मट्टू, नितीन करोसिया, दिनेशभैय्या खरारे, गोपाळ तांबोळी, श्याम तांबोळी, रंजीत मट्टू, सुरज मट्टू, लखमीचंद्र चावरे, अशोक लखन, बबलू कचवे, रंजीत महाराज कचवे, संजू मट्ट, दीपक कचवे, सौरभ तांबोळी, आदित्य खोकरे, ओम मोहित, विजय नरवाडे, करण सरपदे, संतोष बोयत तसेच रेखाबाई करोसिया, रोहिणीबाई खरारे, विद्या मट्ट, कलाबाई खरारे, राधाबाई पवार, मीराबाई नरवाडे, छायाबाई खरारे आदींसह समाजातील सुजाण नागरिक आणि प्रतिष्ठित मतदार महिला-पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते. मेहतर-वाल्मिकी समाजाच्या या एकदिल पाठिंब्याने प्रभाग क्र. ९ ‘ब’ मधील निवडणूक आता एकतर्फी होण्याचे चिन्ह दिसत आहे. ममता अजय डागोर यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिल्याची चर्चा रंगली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button