Advertisement
Railwayक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रराजकीय

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त पोलिसाची 9 लाखात फसवणूक, संशयितास दोन दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ – रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळात घडला असून या प्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, वसंत जानबाजी ढोणे (वय ६६) हे रेल्वे पोलीसात नोकरी करून निवृत्त झालेले आहेत. त्यांची एका परिचीत महिलेच्या माध्यमातून प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, भुसावळ) याच्याशी ओळख झाली. यात अग्रवाल याने ढोणे यांचा मुलगा वैभव याला रेल्वेत हेड क्लार्क म्हणून नोकरी लाऊन देण्याचे आमीष दाखवत यासाठी सात लाख रूपये लागतील असे सांगितले. पैसे दिले तर तुमच्या मुलाला नऊ महिन्यात नियुक्तीपत्र मिळणार असल्याचे त्याने सांगितले. यावर विश्वास ठेवून ढोणे यांनी पहिल्यांदा चार लाख नंतर वेळोवेळी प्रशांत अग्रवाल याला एकूण नऊ लाख चौसष्ट हजार साठ रूपये दिले. यात त्याने एक बनावट नियुक्तीपत्र दिले. यावर स्वाक्षरी व शिक्का नसल्याने ढोणे यांना संशय आला. यावर प्रशांत अग्रवाल याने ते बनावट नियुक्तीपत्र नसल्याने ढोणे यांना संशय आला. यावर प्रशांत अग्रवाल याने ते बनावट नियुक्तीपत्र घेऊन लवकरच पक्की ऑर्डर देतो असे सांगितले. मात्र एवढे करून देखील त्याने नियुक्तीपत्र तर दिले नाहीच, पण नंतर तो ढोणे यांचे कॉलही टाळू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसंत जानबाजी ढोणे यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यात प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, भुसावळ ) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button