लाडकी बहिण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार, अदिती तटकरेंची घोषणा

मुंबई दि-०३/०३/२०२५, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली असून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता येणार आहे. लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे तो कधी येणार याची प्रतिक्षा होती. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. ७ किंवा ८ मार्चला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थींना दोन्ही हप्ते मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. महिला दिन आणि होळी निमित्ताने लाभार्थी महिलांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहेत.महिला दिनानिमित्ताने लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.
या लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात. ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद होणार आहेत. तर काही महिलांनी स्वत:हून अर्ज मागे घेतल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र महिलांच्या संख्येत भर पडली आहे. 7 लाखहून अधिक महिला अपात्र ठरल्या होत्या. अजून काही भागांमध्ये अर्जांची छाननी सुरू आहे.