लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शासकीय निवासस्थानी स्वतःवर केला गोळीबार, प्रकृती गंभीर
प्रशासकीय वर्तुळाला हादरविणारी घटना

लातूर (वृत्तसेवा), दि-06/04/25, राज्यातील प्रशासकीय वर्तुळाला हादरविणारी एक मोठी बातमी समोर आलेली असून, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी रात्री 11.15 च्या सुमारास मनोहरे यांनी रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयानी तात्काळ त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यावर शहरातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब मनोहरे यांनी पिस्तुलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली. त्यामुळे लगेच रक्तस्राव सुरु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका कर्मचारी आणि इतर नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली आहे. त्यामुळं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले आहे.या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाकडे आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाता आयुक्तांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. भाजप नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे अनेक माजी नगरसेवक यांनी हॉस्पिटलला भेट देत बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतले.
बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. पोलिसांनी बाबासाहेब मनोहरे यांच्या घरी जाऊनही घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. मनोहरे यांनी वापरलेली बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बंदूक त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी ठेवलेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण शोधण्यासाठी त्यांच्या फोन रेकॉर्ड्ससह इतर पुरावेही तपासले जाणार आहेत. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. पोलिसांनी बाबासाहेब मनोहरे यांच्या घरी जाऊनही घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. मनोहरे यांनी वापरलेली बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बंदूक त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी ठेवलेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण शोधण्यासाठी त्यांच्या फोन रेकॉर्ड्ससह इतर पुरावेही तपासले जाणार आहेत.