Advertisement
अर्थकारणपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून शासनाने कामगारांच्या हितासाठी उत्सव भत्ता देण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय

मुंबई – राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीकोनातून शासनाने गणेश चतुर्थी निमित्त पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकरांना उत्सव भत्ता देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आज घेतला आहे.
योजना कोणासाठी आणि रक्कम
या योजनेत पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित (certified) आणि नोंदणीकृत (registered) विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता दिला जाणार आहे. या पाच क्षेत्रांमध्ये खालील पारंपरिक उत्पादने समाविष्ट आहेत:
1. पैठणी साडी 
2. हिमरु शाल 
3. करवत काठी साडी 
4. घोंगडी 
5. खण फॅब्रीक 
पात्र विणकरांना दिली जाणारी रक्कम खालीलप्रमाणे आहे: 
प्रति पुरुष विणकर — ₹१०,०००/- 
प्रति महिला विणकर — ₹१५,०००/- 
हा भत्ता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत पारंपरिक हातमाग विणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती आणि आता २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी त्याची अंमलबजावणी होत आहे.
अंमलबजावणीचे नियम
हा भत्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. 
वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी निश्चित करून, योग्य तपशीलासह देयकासोबत जोडणे अनिवार्य आहे. याशिवाय अनुदान आहरित करता येणार नाही. 
निधीच्या वापरासाठी आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर हे नियंत्रण अधिकारी आणि सहायक संचालक (लेखा) हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येईल. खर्च झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालयास आणि शासनास सादर करणे आवश्यक आहे.
निर्णयाचे महत्त्व असे
हा निर्णय पारंपरिक हातमाग विणकाम क्षेत्रातील कुशल कारागिरांना, विशेषतः महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा आहे. पैठणी, हिमरु, घोंगडी यांसारख्या पारंपरिक कला जपणाऱ्या विणकरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल. राज्य शासनाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत अशा योजना राबवून हातमाग उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button