
भुसावळ दि-28/11/25, , नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपच्या उमेदवार प्राची उदय पाटील यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे आणि उमेदवार सविता रमेश मकासरे यांच्यासह सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचार कार्यालयाचे आज हिंदू हौसिंग सोसायटीच्या कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज या प्रभागात घरोघरी जाऊन भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह उमेदवार प्राची उदय पाटील आणि सविता रमेश मकासरे यांनी मतदारांचा आर्शिवाद घेतला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह उमेदवार प्राची उदय पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला ज्या पद्धतीने या प्रभागातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

याप्रसंगी प्रभाग क्रमांक 2 मधील प्रतिष्ठित नागरिक, मतदार महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. उमेदवार प्राची उदय पाटील यांना या प्रभागातील मतदारांकडून प्रचारा दरम्यान उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. यामुळेच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.













