Advertisement
अर्थकारणजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

संजय गांधी निराधार योजनेसह,दिव्यांगांसाठीच्या अनुदानात 1000 रुपयांची वाढ ,मंत्री अतुल सावे यांचे विधान परिषदेत निवेदन

मुंबई, दि. 18 जुलै : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाचे निवेदन करत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा 2,500 रुपये अनुदान देण्याचे घोषित केले.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या दरमहा 1,500 रुपये अनुदानात आता थेट 1000 रुपयांची वाढ करून ते 2,500 रुपये करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button