सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांचे आत्मदहन आंदोलन स्थगित, तापी पाटबंधारे विभागाने व्यक्त केली दिलगिरी
न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा

जळगाव दि- १५/०४/२०२५, जळगाव येथील तापी पाटबंधारे विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींबाबत कोणतीच उचित कार्यवाही होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार श्री संजय खन्ना यांनी दि. 11/04/2025 रोजी मी मुख्य अभियंता तापी पाटबंधारे कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचा अर्ज लेखी स्वरूपात अर्ज केला होता. यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात खळबळ उडालेली होती. यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या पत्राची दखल घेत, श्री संजय खन्ना यांना आपले आत्मदहन करण्यापासून परावृत्त होण्याबाबतचे पत्र पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून प्राप्त झालेले होते. त्यानंतर श्री संजय खन्ना यांनी म्हटलेलं आहे की, पाटबंधारे विभागाच्या आपल्याला उत्तर दिलेले होते की जेव्हा पर्यंत आपल्या कार्यालया कडून माझ्यावर केलेल्या आरोपांचा माफीनामा आपल्या कार्यालया कडून लेखी स्वरूपात मिळणार नाही, तोपर्यंत मी दि.28/03/2025 चे पत्रानुसार आंदोलनातून माघार घेणार नाही. तरी आपल्या दि.08/04/2025 रोजी चे पत्र ईमेल व्दारे प्राप्त झाले असून त्यात तुम्ही उल्लेख केलेला आहे, की सदर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने सदर वाक्यास पाटबंधारे विभागाच्या सावदा उपविभाग यांचेकडून अंतर्भुत करण्यात आलेले असून सदर वाक्याबद्दल हे कार्यालय दिलीगिरी व्यक्त करीत असून आपल्याला जेष्ठत्वाचा सन्मान व आपल्या सामाजिक कार्याबद्दल या कार्यालयास नक्कीच आदर आहे. तरी सदर पत्रान्वये आपण मला विनंती केलेली आहे की, दि.11/04/2025 रोजी आत्मदहन परावृत्त व्हावे अशी विनंती केली. तरी वरील दि.08/04/2025 चे ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने आपण दिलगीरी व्यक्त केल्यामुळे मी दि.11/04/2025 रोजी नियोजित आत्मदहन आंदोलनाला स्थगित करण्यात येत आहे. तरी उपरोक्त विषयानुसार माझ्यावर केलेल्या आरोपावर मी आता वकिलांचा कायदेशीर सल्ला घेऊन त्यानुसार न्यायालयात बदनामीकारक अपशब्द व खोटे आरोप करू माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहचवून खच्चीकरण केल्याप्रकरणी दावा दाखल करण्यात येई,असा इशारा दिलेला आहे.