स्व.संतोष बारसे व स्व. सुनिल राखुंडेच्या खुनातील दोषींना शिक्षा द्या – मिथुन बारसे
शेकडो गरिबांना अन्नदान व शवपेटीचे लोकार्पण

भुसावळ,दिनांक-18/05/25 स्व. संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या दुहेरी कोणाच्या हत्याकांडातील आरोपींना पकडून शिक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या,अशी मागणी मिथुन मोहनजी बारसे यांनी केलेली आहे.

आज भुसावळ शहरातील वाल्मीक नगरात स्वर्ग संतोष बारसे आणि स्वर्ग सुनील राखुंडे यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशभरातील वाल्मिकी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व हजारो समाज बांधव उपस्थित होते. यावेळी गणेशभैय्या बारसे, माजी नगरसेवक पप्पूभैया बारसे, सफाई कामगार संघटनेचे सचिव संतोष थामेत, राकेश बारसे, संजय रल, गब्बर चावरीया, माजी नगरसेवक युवराज लोणारी, कार्यकर्ते भागवत सावकारे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

शवपेटीचे लोकार्पण
भुसावळ शाळेतील वार्ड क्रमांक नऊ मधील नागरिकांसाठी आणि वाल्मिकी समाजासाठी आज शवपेटीचे लोकार्पण वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

गरजूंना अन्नदान वाटप
वार्ड क्रमांक 9 मधील शेकडो गरीब नागरिकांना यावेळी अन्नधान्याचे किट व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, युवराज लोणारी, मिथुन बारसे, दीपक बारसे, क्रिश बारसे आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
