Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

खंडणी मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आ. मंगेश चव्हाण थेट पोलिस ठाण्यात ठाण मांडून

#MLAMangeshchavan | जळगाव दि-19/05/25, जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तडजोडीनंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने एक लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
खंडणी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
संबंधित तरुणाने यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी चाळीसगाव पोलिस ठाणे गाठले. यावेळी आमदारांनी तक्रारदार तरुणाशी पोलिस अधिकाऱ्यांसमोरच संवाद साधला. त्यावेळी संबंधित तरुणाने पैशांची मागणी झाल्याची कबुली दिली. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता, त्या पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली
आहे.
दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाणे सोडणार नाही, असा पवित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले, आताच्या आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा, त्याला अटक
करा. पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही ? असा प्रश्नही आमदार चव्हाण यांनी विचारला.
काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या अनुदान प्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आवाज उठवला होता. विहिरीच्या अनुदानासाठी पंचायत समितीचे कर्मचारी 20 ते 30 हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार आमदार चव्हाण यांच्याकडे आली होती. यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पंचायत समिती गाठत, दोन दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button