राजकीय

हतनूर धरणाचे या मोसमात सर्वाधिक 18 गेट पूर्ण क्षमतेने उघडले, तब्बल 1लाख 3,402 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात


भुसावळ- दि:-29 जुलै , जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खान्देशातील सर्वात मोठ्या असलेल्या हतनूर धरणाच्या मुख्य जलस्रोत असलेल्या तापी आणि पूर्णा या नद्यांच्या  जलप्रवाहात जलसंचय वाढून पाण्याची पातळी वाढल्याने दिनांक 29 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे या मोसमात पहिल्यांदाच 18 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. त्यातून तब्बल 103402 क्युसेक इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे.
       तरी एकंदरीत प्रचंड प्रमाणात जलप्रवाहाची परिस्थिती बघता, तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना नदीजवळ जाण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाऊच नये , आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव तापी पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
क्युसेक म्हणजे काय ?
दर पावसळ्यामध्ये ऐकायला मिळणारा क्युसेक हा शब्द वाहतं द्रव्य मोजण्यासाठी केला जातो. आता एक क्युसेक म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर 1 क्युसेक पाणी म्हणजे दर सेकंदाला 28.32 लिटर पाणी असा होतो. म्हणजेच 2 क्युसेक पाणी सोडलं असं म्हटलं तर दर सेकंदाला 56.64 (28.32 × 2) लिटर पाणी सोडण्यात आलं. क्युसेक हा शब्द क्युब पर सेकेण्ड्स वरुन आला आहे. प्रत्येक सेकंदाला किती क्युब पाणी सोडलं जातं हे या सूत्रांनुसार यामधून समजतं. म्हणजेच आता हतनूर धरणातून 103402 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला याचा अर्थ लिटरमध्ये काढायचा झाला तर 28.32 × 103402 म्हणजेच सेकंदाला 29,28,344.64 लाख  हजार लिटर पाणी धरणामधून सोडलं जात आहे.
टीएमसी म्हणजे किती लिटर?
टीएमसीचा फुलफॉर्म Thousand Million Cubic Feet असा होतो. आता एक टीएमसी पाणी म्हणजे किती असं वाचालं तर 1 टीएमसी म्हणजे 2,831 कोटी लिटर इतकं पाणी होतं. सामान्यपणे भारतामध्ये धरणांमधील पाण्याची क्षमता किंवा नदीमधून वाहणारं पाणी मोजण्यासाठी हे मोठं एकक वापरलं जातं. भारत सरकारचा केंद्रीय जल आयोगाकडून धरणांमधील पाणीसाठा मोजण्यासाठी हेच एकक वापरलं जातं. ही केंद्रीय संस्था असल्याने देशभरामध्ये धरणांमधील पाणी या एकाच एककाने मोजलं जातं. कृषी तज्ञांच्या सांगण्यानुसार एक टीएमसी पाण्यामध्ये 10 हजार एकर जमीनीला 1 वर्ष सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येईल.धरणातील पाण्याचा विसर्ग दिवसभरात अनेकदा सोडण्यात येत असल्याने यांची आकडेवारी बदलत असते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button