जळगावमुंबई

नाही तर… जळगाव जिल्ह्यातील मद्यविक्री परवानाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द होतील – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव , दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासापासून म्हणजेच 11 मे 2024 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच 12 मे 2024 आणि 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button