उद्धव ठाकरेंनी खेकड्यांना जपलं असत तर शिवसेना कधीच फुटली नसती- ना. गुलाबराव पाटील,पाणी पुरवठा मंत्री
मुंबई, 25 जुलै | शिवसेना खासदार व सामनाचे कार्य़कारी संपादक संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री, उ बा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत! “आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” या शीर्षकाखाली घेतलेली मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्याच्या आधी त्याचा प्रोमो टिझरला लाँच करण्यात आला आहे. यामधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबासह केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली आहे. त्यांनी शिंदे दिल्लीत जाऊन मुजरा करतात असं म्हटलं होतं. तर शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिली. त्यांनी, माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं असं उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. त्यावरून आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी, खेकडा हा गुणकारी प्राणी असतो. तो कावीळवर योग्य पर्याय ठरतो असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तर आम्हाला खेकडे म्हणता पण जर हेच खेकडे तुम्हाला व्यवस्थित सांभाळले असते तर शिवसेना कधीही फुटली नसती. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. पण आपण कोणाबरोबर बसलो आहोत हे ही एकदा तपासायला हवं असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता. आत्ता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावं लागेल. तुम्हीही कधीकाळी दिल्लीत जाऊन राम राम करायचे त्याच काय ? असाही सवालही गुलाबराव पाटील यांनी ‘टिव्ही नाइन मराठीला’ दिलेल्या मुलाखतीत आता उद्धव ठाकरे यांना केला आहे.