महाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय
Trending

जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास कालवश , संगीत विश्वासह कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्का

रेशमी सूरांचा महान स्वरसम्राट हरवला

मुंबई– दि-२६ फेब्रुवारी, जगातील संगीत विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे.संगीतप्रेमी तथा गझलप्रेमींसाठी अतिशय दुःखद अशी बातमी समोर आली आहे.आपल्या रेशमी सूत्रांनी जगातील कोट्यवधी संगीत प्रेमी , गझलप्रेमींना वेड लावणाऱ्या महान गझल गायक पंकज उधास यांचं आज २६ फेब्रुवारी रोजी निधन झालेलं आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार ते गेली अनेक दिवस आजारी होते. आजारपणामुळे त्यांचा निधन झालं आहे. आज २६ फेब्रुवारी रोजी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते आणि ते कोणालाही भेटत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अत्यंत जड अंतःकरणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. उधास परिवार.’ यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


पंकज उधास यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गेले कित्येक दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांची सिनेसृष्टीतील आणि संगीतातील कारकीर्द ही अतिशय मोठी होती. त्यांच्या गझल, त्यांची अनेक गाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. त्यांचं ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याने तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचेसह करोडो चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आज स्वरसम्राट हरपला अशी भावना प्रेक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे. त्यांची ‘जिये तो जिये कैसे’, ‘जो गीत नही जनमा’ , ‘और भला क्या मांगू मैं रबसे’,  ‘ना कजरे की धार’, ‘चांदी जैसा रंग’, ‘एक तराफा उसका घर’, ‘मैं नशे मे हू’, ‘मैं पिता नही हू’ , ‘माहोल बेमजा है तेरे प्यार के बगैर’ , यांसारखी असंख्य गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती. त्यांना २००६ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया उमटत आहेत. संगीत क्षेत्रासोबतच बॉलिवूडमधूनही शोक व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी गायकावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज उधास यांच्या निधनानंतर भारतीय संगीतसृष्टीच नाही तर अख्खा जगात त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. ते सगळे चाहते आता पोरकी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ‘मिडिया मेल’ न्यूज ग्रुप तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button