पुण्यातील शरद मोहोळ हत्येचे धागेदोरे जळगावच्या सीमेलगत, वापरलेले पिस्तूल बनले सातपुडा पर्वतराजीत !
पुणे दि-11, पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात आता दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 8 आरोपी अटकेत होते. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. आता या दोघांना अटक झाल्याने आरोपींची संख्या 10 वर पोहोचली. आता या शरद मोहोळ हत्या प्रकरणात या दोन आरोपींनी नेमकी काय भूमिका बजावली? त्यांचा या हत्याकांडात नेमका किती हात व पाय आहे. याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
शरद मोहोळ हत्याकांडाचा मास्टरमाईंड मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकर याने चार महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. हत्येपूर्वी सरावासाठी त्याने ही पिस्तुल खरेदी केली होती. या पिस्तुलासह गोळीबार करण्याचा त्याने मुळशीत सराव देखील केला होता. त्यामुळे मोहोळ हत्याकांडासाठी ज्या पिस्तुली वापरण्यात आल्या होत्या. त्या पिस्तुली पुरवणारे आता अटकेत आले आहेत. धनंजय मारूती वटकर (वय 25) राहणार कराड आणि सतीश संजय शेडगे (वय 28)अशी या आरोपींची नावे आहेत.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मास्टरमाईंड साहिल पोळेकर आणि त्याच्या साथीदारांना धनंजय वटकर आणि सतीश शेडगे या दोघांनी पिस्तूल पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यांनीं हे पिस्तूल जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या सातपुडा पर्वतराजीतील एका तस्कराकडून चार महिन्यांपूर्वी खरेदी केल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आलेली आहे. बुधवारी या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली होती.आता तपास पथके जळगाव जिल्ह्यालगतच्या सातपुडा पर्वतराजीतील ‘त्या’ तस्कराकडे पाठविण्यात आलेली असून त्यालाही हत्याकांडातील सहआरोपी करण्यात येणार आहे.
तपासात आणखी धक्कादायक बाबी येणार समोर
आरोपींनी मुळशी परिसरात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला होता. त्या गोळीबाराची ठिकाणे शोधायची आहेत. तसेच मोबाईलमध्ये नवीन सीमकार्ड टाकून आरोपींनी काही लोकांशी संपर्क साधला होता, त्या लोकांचा शोध घ्यायचा आहे. त्याचसोबत ज्या रिक्षातून आरोपींनी पळ काढला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करायची आहे. यासह अटकेतील आरोपींचाही शोध घ्यायचा आहे. अशी सर्व मागणी करून गुन्हे शाखेचे सहआयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत सात दिवसाची वाढ केली आहे.
मोहोळ खून प्रकरणातील आरोपींविरोधात १२० ब (कट रचणे) हे अतिरिक्त कलम लावण्यात यावे, असा अर्ज तपास अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. ‘या आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी मुळशी तालुक्यात दोन-तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला असून, ती ठिकाणे शोधायची आहेत. एका व्यक्तीने आरोपीला सीमकार्ड दिले असून, त्याद्वारे आरोपींनी काही कॉल केले आहेत. त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी रिक्षाचा वापर केला असून, त्या रिक्षाचालकाचाही शोध घ्यायचा आहे. आरोपी व साक्षीदारांची समोरासमोर चौकशी गरजेची आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी,’ अशी मागणी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त व तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली आहे.