न्यायमूर्तींच्या विरोधात बदनामीकारक वृत्त प्रकाशित केल्या प्रकरणी ‘या’ वृत्तपत्राला १० लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय
'सूत्रांचा' हवाला वृत्तपत्राला महागात पडला
एका जिल्हा न्यायाधीशांच्या चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षाच्या विरोधात केलेल्या निष्कर्ष दर्शवणारा अहवाल आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित केल्यामुळें कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ या प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्राच्या मदुराई येथील मालकाला तब्बल दहा लाख रुपयांचा दंड उठावलेला आहे. यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड खळबळ उडालेली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, संबंधित अहवाल प्रकाशित होण्याच्या सहा महिने आधीच तो चौकशी अहवाल न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि हाच मुद्दा वृत्तपत्रातून वगळण्यात आला होता त्यामुळे एक प्रकारे त्या वृत्तातून अपूर्ण माहिती प्रकाशित करून त्या संबंधित जिल्हा न्यायाधीशांची बदनामी झाल्याचा निष्कर्ष राहणार उच्च न्यायालयाने काढलेला आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेस सारख्या जबाबदार आणि प्रतिष्ठित दैनिकाने संपूर्ण प्रकरणाचे तथ्य शोधून काढायला हवे होते , केवळ सूत्रांनी दिलेल्या अपूर्ण माहितीच्या आधारावर वृत्त छापण्यासाठी त्याची खात्री किंवा शहानिशा करणे आवश्यक होते. कारण हे प्रकरण एका जिल्हा न्यायाधीशांच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याच्या संदर्भातील अत्यंत संवेदनशील प्रकरण होते. वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या वृत्तात विभागीय चौकशीतून अद्ययावत वस्तुनिष्ठ अहवाल आलेला असताना आणि संबंधित न्यायिक अधिकारी त्यात निर्दोष असल्याचा उल्लेख असताना सुनावणी आधीच जुना अहवाल प्रकाशित करण्यात आल्यामुळे न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला आहे.