खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली मात्र उमेदवार ‘नॉट रिचेबल’, चर्चांना उधाण
मुंबई ,दिनांक 27 मार्च, आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. या यादीत एकूण 16 उमेदवारांची नावे असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात होते.
दरम्यान, या यादीत मुंबई वायव्य लोकसभा क्षेत्रासाठी अमोल गजानन कीर्तिकार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहेत. मात्र ते आज सकाळ पासूनच ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे दोन्हीही मोबाईल नंबर बंद असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यांना ईडीचे समन्स आल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरलेली आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.