उन्मेष पाटलांनी एकनाथ शिंदेंचा ‘धनुष्यबाण’ घालून उबाठा उमेदवाराचा केला प्रचार
'धनुष्यबाण' घातल्याने उन्मेश पाटील ट्रोल
जळगाव ,दि- 4 एप्रिल, आज जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार आणि जळगावचे माजी खासदार उमेश पाटील यांच जोरदार स्वागत करण्यात आल.
मात्र अशा परीस्थितीत एक धक्कादायक चित्र समोर आलेल आहे. उन्मेश पाटील यांनी करणं पवार आणि समर्थक कार्यकर्त्यांसह काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेलं होतं. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलेला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक आयोगाने दिलेले अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणून ‘मशाल’ आहे. अशातच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी मशाल चिन्ह असलेले गमछे गळ्यात घातलेले असताना आज उन्मेष पाटील यांनी मशाल चिन्ह असलेला गमछा गळ्यात घातला नाही.उन्मेष पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ चिन्ह असलेला गमछा गळ्यात घातल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आणि जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर गाडीतून उतरल्या पासून ते थेट गोलाणी मार्केट मधील शिवसेना कार्यालयापर्यंत पायी निघालेल्या मिरवणुकीत हाच धनुष्यबाण असलेला गमछा त्यांच्या गळ्यात दिसत होता. त्यामुळे उन्मेश पाटील यांना नेमके काय दर्शवायचे होते ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे उन्मेश पाटील हे शिवसेनेत जरी दाखल झालेले असले तरी ते नेमके उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात आहे की ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत ? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकाराची सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. आता उन्मेश पाटील याबाबत काय खुलासा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.