नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार
नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मोटारसायकल आणि पिकअपमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला हवेत उडून गेले होते. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नाशिक -दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघाता पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ महामार्गावर दुपारी दुचाकी आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे जानोरी फाट्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी आणि पिकअपची धडक झाली. या धडकेत ५ जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.
अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अपघात इतका भीषण होता की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे. तर दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला पडले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे.