१५४० कोटी रुपयांच्या ड्रग्सचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई सीमाशुल्क विभागाने नेमके काय केले ?
कोर्टाच्या आदेशानुसार ड्रग्स केले नष्ट
मुंबई दि-२० मार्च, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अमली पदार्थ नष्ट करणाऱ्या उच्च स्तरीय समितीने 19.03.2024 रोजी 31.948 किलो वजनाचे अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस), अर्थात मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम करणारे पदार्थ जप्त केले. यामध्ये हेरॉईन, कोकेन, मारिजुआना ई. अमली पदार्थांचा समावेश होता. कॉमन हॅझर्डस वेस्ट ट्रीटमेंट स्टोरेज अँड डिस्पोजल फॅसिलिटी (सीएचडब्ल्यूटीएसडीएफ), तळोजा, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.
चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी कारवाई आहे. 19.07.2023 रोजी केलेल्या पहिल्या कारवाईत अवैध बाजारात 865 कोटी रुपये किमतीचे 128.47 किलो आणि 13.12.2023 रोजी केलेल्या दुसर्या कारवाईत 54.85 किलो वजनाचे 410 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षात 1540 कोटी रुपये किमतीचे एकूण 215.268 किलो वजनाचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. टपाल मूल्यांकन विभाग (पीएएस), विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी मुंबई सीमाशुल्क विभाग, एनडीपीएस च्या बेकायदेशीर तस्करीविरूद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.