जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

एकनाथराव खडसेंची ‘घरवापसी’ या नेत्याने घडवून आणली ! ‘हा’ नेता ठरला फडणवीसांना वरचढ ?

आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत पाटील यांची गोची ?

जळगाव- एकनाथराव खडसे हे दिल्ली दरबारी गेल्याने तेव्हा पासून ते भाजपात घरवासी करणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘मीडियामेल’ न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केले होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त ‘मिडिया मेल’ न्यूजने सातत्याने प्रकाशित केलेले होते. मात्र एकनाथराव खडसेंनी त्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले होते. मात्र त्या बातमीवर आज शिक्कामार्फत झालेले असून आज एकनाथराव खडसे यांनी स्वतः ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. त्यामुळे मीडियामेल न्यूज च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

तीन वर्षांपूर्वी एकनाथराव खडसे हे पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता. तसेच शरद पवारांनी एकनाथराव खडसेंना विधान परिषदेचे सदस्यत्व सुद्धा बहाल केलेले होते. त्यानंतर मात्र खडसेंचे राष्ट्रवादीत मन लागत नव्हते. तर दुसरीकडे त्यांच्यावर कायदेशीर अडचणींचा डोंगर उभा राहत होता. एकीकडे ईडीच्या कारवायांनी ग्रासले होते तर दुसरीकडे पुण्याच्या भोसरी भूखंड घोटाळाप्रकरणी वारंवार कोर्टाच्या पायऱ्या चढव्या लागत होत्या. तसेच मागील वर्षी त्यांना मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील एका अकृषक भूखंडावर बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी 137 कोटींचा दंड आकारण्यात आलेला होता.याप्रकरणी भुसावळचे तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित झालेले होते. तो 137 कोटींचा दंड एकनाथराव खडसेंच्या मालमत्तांवर बोझे बसविण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती. गेल्या महिन्यात त्या कारवाई पासून सुद्धा एकनाथराव खडसेंना दिलासा मिळालेला आहे. तसेच त्यांनी गेल्या वर्षभरापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वैयक्तिक वादाला शांत स्वरूप दिलेले असून कोणत्याही प्रकारची टीका केलेली दिसली नाही.

म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताबडतोब जळगावला आलेले होते….इनसाईड स्टोरी त्यामुळेच एकनाथराव खडसे हे लवकरच भाजपा प्रवेश करण्यात असल्याची माहिती सर्वप्रथम ‘मीडियामेल ‘न्यूजने प्रकाशित करून खळबळ उडवून दिलेली होती. याच बातमीची री ओढत ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकाने सुद्धा तीन दिवसांपूर्वी एकनाथराव खडसेंच्या भाजपातील पक्ष प्रवेशाच्या बातमीचे वृत्त दिलेले होते.
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून एकनाथराव खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रचंड इच्छुक होते मात्र राज्यातील स्थानिक नेत्यांचा त्यात अडथळा निर्माण होत होता अशी माहिती समोर आलेली आहे.

विनोद तावडे ठरले फडणवीसांना वरचढ दरम्यान ,राज्यातील सर्वच वरीष्ठ नेत्यांना भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे वरचढ ठरलेले असून त्यांनीच खडसेंची गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घालून सविस्तर चर्चा करून एकनाथराव खडसेंच्या घरावापसीचे प्रयत्न केलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खडसेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होत की, माझे नरेंद्र मोदी,अमित शहा ,जेपी नड्डा यांच्याशी पूर्वीपासून घनिष्ठ संबंध असून मला  भाजपात जायचे असल्यास शरद पवारांना विचारून भाजपमध्ये जाईल अशी प्रतिक्रिया दिलेली होती.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची गोची
कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर तडकाफडकी आलेले होते. ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या चर्चेच्या आमंत्रणावरूनच तात्काळ जळगाव भेटीसाठी आलेले होते. हे आता सिद्ध होत आहे. या संदर्भातील इनसाईड स्टोरीचे वृत्त कालच मीडिया में न्यूजने प्रकाशित केलेले होते. आता चंद्रकांत पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे रावेर आणि मुक्ताईनगर मतदार संघासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. एकनाथराव खडसे हे भाजपात आल्याने येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ होणार असून खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि इतर पक्षातील कोणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक एकनाथराव खडसेंसोबत भाजपात पक्षप्रवेश करतात याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहेत. खडसेंसह 100 माजी नगरसेवक, 50 माजी जि.प. सदस्य, 2 माजी आमदार आणि इतर 500 कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अमोल जावळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार ?

भाजपचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचा चर्चांना उधाण आलेले असून त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याची त्यांची खात्री झालेली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ते अमोल जावळे हे सुरुवातीपासूनच रावेर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने ते नाराज झालेले होते तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामे सुद्धा दिलेले होते.आता येणाऱ्या काळात एकनाथराव खडसे हे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी कसे जुळवून घेतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button