आ.मंगेशदादा चव्हाण कोहिनूर….बारा भोकांचा पान्हा !! कोणताही नट टाईट करू शकतो – ना.गिरीष महाजन
मुक्ताईनगर दि:31 मुक्ताईनगरच्या तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष नजमा तडवी यांना गेल्या वर्षी जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर करता न आल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र करण्यात आलेले होते. या संदर्भात त्यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या कानावर झालेल्या अन्यायाची व्यथा सांगत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ही जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांचा वर सोपवलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नजमा तडवी यांच्या अपात्रतेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निमित्ताने मुक्ताईनगर येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री ना.गिरीष महाजन यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. ते म्हणाले की, “आमदार मंगेशदादा चव्हाण हे तांत्रिक दृष्ट्या सक्षम आहे. ते कोणतेही काम पूर्ण करून दाखवतात.जे काम कुणी करू शकत नाही, ते मंगेश चव्हाण करतात, ते कोहीनूर आहेत…. दानवेंच्या भाषेत सांगावयाचे तर बारा भोकांचा पान्हा !! एकच पान्हा कुठलाही नट टाईट करून काम करून टाकतो !” अशा शब्दांमध्ये ना. गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाणांचे कौतुक केले.ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, 16 ऑगस्टला जो निर्णय होईल तो होईल,परंतु आदिवासी समाजातून असलेल्या नजमाताईंना एका दिवसासाठी किंवा एका तासासाठी तरी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना नगराध्यक्ष पदावर रूजू करण्यात आम्हाला यश आले,यांचा आम्हाला आनंद आहे. आता येणाऱ्या दोन-तीन दिवसात मुक्ताईनगरच्या विकासासाठी दोन-चार कोटी रुपये तात्काळ नगर विकास विभागाच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे ना गिरीश महाजन यांनी सांगितलेले आहे.