झुलेलाल वॉटरपार्क व रिसॉर्टविरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग व प्रदूषण मंडळाकडे तक्रारी दाखल,लवकरच होणार कारवाई
कोणताही परवाना नसल्याने अनेक विभागांची लवकरच होणार कारवाई

जळगाव,दि-११/०४/२०२५, जळगाव तालुक्यातील शिरसोली रोडवरील नागझिरी शिवारातील गट नं १२९/२/२ यांचे एकूण क्षेत्र ०.४००० हेक्टर आर चौ. मी. आणि गट नं १२९ / २ / ब याचे एकूण क्षेत्र ०.८१०० हेक्टर आर चौ. मी.ता. जळगाव या जळगाव शहरातील जागामालकाने गेल्या चार वर्षांपासून वरील गटांमध्ये त्यांनी अनधिकृतपणे झुलेलाल वाटर पार्क व रिसॉर्ट उभारलेले असून त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुद्धा केलेले आहे. याबाबत जळगावचे तहसीलदार यांनी यापूर्वीच याची पुष्टी केलेली असून याबाबत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जळगाव यांच्याकडे यासंदर्भात लेखी स्वरुपात कळविलेले आहे. या जागेमध्ये बाहेरून पाणी आणलेले आहे. याबाबत जागामालक यांनी म.ज.म.अधिनियम १९६७ चे कलम ४९ प्रमाणे व नियम २ प्रमाणे पाणी वाहून नेण्यासाठी जलसंपदा विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही उचित परवानगी घेतलेली नाही. तसेच या जागामालकाने शासनाकडून कोणत्याही प्रकारचा आवश्यक असलेला अन्न सुरक्षा विभागाचा, हॉटेलचा आणि वाणिज्य प्रयोजनाचा कोणताही परवाना न घेता सदरील वाटरपार्क मध्ये विविध प्रकारचे महागडे खाद्य पदार्थ विक्री सुरू केलेले आहे. तसेच या ठिकाणी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे या ठिकाणी अन्नातून विषबाधा होऊन एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे या झुलेलाल वॉटरपार्क व रिसॉर्टच्या मालकाविरोधात उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव, आणि अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव यांच्याकडे लेखी स्वरुपात करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या वॉटरपार्कला १,३८,००० रू चा दंड मागील वर्षी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जळगाव यांनी केलेला होता.
लवकरच कारवाई करू
सदरील झुलेलाल वॉटर पार्कला व रिसॉर्टला आज रोजी आवश्यक असलेली परवानगी आमचे कार्यालयाकडून देण्यात आलेले नसून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लवकरच संबंधित ठिकाणी आमच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांमार्फत भेटी देऊन उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री करणसिंह राजपूत , उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ , जळगाव यांनी दिलेले आहे.
तात्काळ उचित कार्यवाही करू
सदरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टला आज रोजी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी आमचे कार्यालयाकडून देण्यात आलेली नसून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लवकरच संबंधित वाटरपार्क ठिकाणी भेटी देऊन, संबंधितांवर उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, श्री संतोष कांबळे, जळगाव यांनी दिलेले आहे.