अर्थकारणजळगावमहाराष्ट्रमुंबई

EPF पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून, कोठेही विनाअडथळा आता पेन्शन मिळवता येईल

नवी दिल्ली – निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली.

ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये कर्नाल, जम्मू आणि श्रीनगर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला. यामध्ये 49,000 हून अधिक ईपीएस पेन्शनधारकांना सुमारे 11 कोटी रुपये पेन्शन वितरीत करण्यात आले.

दुसरा प्रायोगिक उपक्रम नोव्हेंबर 2024 मध्ये 24 प्रादेशिक कार्यालयांमध्ये हाती घेण्यात आला, ज्यामध्ये 9.3 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना सुमारे 213 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले.

या यशाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले, “ईपीएफओच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमची (सीपीपीएस) संपूर्ण अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या परिवर्तनकारी उपक्रमामुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून, कोठेही विनाअडथळा पेन्शन मिळवता येईल. यामुळे प्रत्यक्ष पडताळणी भेटीची आवश्यकता दूर झाली असून, पेन्शन वितरण प्रक्रियेत सुलभता आली. सीपीपीएस हे ईपीएफओ सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि आपल्या पेन्शनधारकांना  सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. ही सुविधा कार्यान्वित करून, आम्ही तंत्रज्ञान-स्नेही आणि सदस्य-केंद्रित ईपीएफओच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, पेन्शन सेवा वितरणात एक नवीन मानक स्थापित करत आहोत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button