क्राईम/कोर्टजळगावमुंबई

जळगावात टँगो पंच,मॅकडॉल व्हिस्की आणि रॉयल स्टॅग कंपनीच्या बनावट दारू निर्मिती करण्याचा भंडाफोड

जळगाव दि-06/01/2024, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरातील नवल नगर येथे जितेंद्र वैद्यनाथ भाट हा त्याच्या घराच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये देशी आणि विदेशी नकली दारू तयार करीत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड साहेब यांना मिळाली होती. त्यादृष्टीने दिनांक-06 जानेवारी रोजी रात्रीचे मध्यरात्री 01.30 वाजता सदर ठिकाणी छापा मारून जितेंद्र वैद्यनाथ भाट वय 55 राहणार नवल नगर कंजर वाडा हा बनावट दारू तयार करीत असताना मिळून आला होता.त्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या भरलेल्या बाटल्या व खाली बाटल्या मिळून आल्या होत्या तो बनावट दारू तयार करत असल्यामुळे  त्याच ताब्यात घेण्यात आली असून त्याचे जवळ टॅंगो पंच देशी 38 नग बाटल्या मॅकडॉल कंपनीच्या 15 नग व रॉयल स्टॅग कंपनीच्या 14 नग विदेशी दारूच्या बाटल्या अशा तयार नकली लेबलच्या दारूच्या बाटल्या व बनावट दारू तयार करणे कामी लागणारे रसायन व विविध कंपनीच्या 2500 नग खाली दारूच्या बाटल्या व बाटल्यांचे बूच असे मिळून आले होते. सदरची बनावट दारू ही मानवी जीवितास अपायकारक असल्याने व तो घातक रसायनाद्वारे सदरची बनावट दारू तयार करत असल्यामुळे त्याचे विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यास अटक करण्यात येऊन  न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. यादरम्यान त्याने रसायन कुठून आणले व बनावट दारू कोणाला विक्री करणार होता व करीत होता याची माहिती घेण्यात येत असून सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री माहेश्वरी रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे राजेंद्र उगले सहाय्यक फौजदार अतुल वंजारी राजेश मेढे विजय पाटील हरिलाल पाटील प्रमोद ठाकूर महिला पोलीस कर्मचारी रूपाली खरे अशांनी केलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button