पिस्तुलाच्या धाकावर भुसावळ -जामनेर रोडवर बारा लाखांची रस्तालूट करणारे ४ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव ;दि: 9 एप्रिल, दिनांक 3 एप्रिल रोजी भुसावल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामनेर रोडवरील महादेव माळ तांडा फाट्याजवळ एका दुचाकीस्वाराला रात्रीच्या वेळी अडवून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून आणि धमकावून त्याच्या जवळील अकरा लाख रुपये रोकड असलेली बॅग काही अज्ञात लूटारूंनी लंपास केली होती. यासंबंधीचा रस्तालुटीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता.संबंधित तरूण हा भुसावळहून जामनेर मार्गे कामानिमित्त जात होता. या रस्तालुटीतील फरार झालेल्या संशयित ४ आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत तब्बल काही तासानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात माहिती मिळताच भुसावळचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, यांच्यासह जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दाखल झालेले होते. या प्रकारे पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून फरार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ रवाना केलेली होती.
याबाबत वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येऊन आणि तांत्रिक विश्लेषण करून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चार संशयितांना त्यांना अटक केलेली आहे. चौघा संशयिताना कंडारी परिसरातील झेटटीसी भागातून अटक करण्यात आलेली आहे. आरोपींकडून दहा लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेलं आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील तपास पथक बारीक लक्ष ठेवून तपास कार्य करत होते. पकडलेल्या चार संशयितांपैकी दोन संशयित हे विधी संघर्ष बालक तथा अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्यायालयात तर अन्य दोघा आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते.