बस पलटी,55 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचे घाटात ब्रेक फेल, बुलढाण्यातील राजूर घाटात भीषण अपघात
बुलढाणा दि-25 बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झालेली आहे. या बसमधून एकूण 55 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातामध्ये 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांची धाव
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.
अचानक ब्रेक फेल
मलकापूर -बुलढाणा या बसमधून एकूण 55 प्रवासी प्रवास करत होते, बस राजूर घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक अचानक फेल झाले. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला.लागलीच बस राजूर घाटात पलटी झाली.या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे.त्यासोबतच पोलीस पथक व आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झालेला आहे.